शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

साधारण डोकेदुखी समजुन करत होता दुर्लक्ष, २० वर्षानंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 12:21 PM

आता डोकेदुखीचं एक असं कारण समोर आलंय ज्यामुळे तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल पण विश्वास बसणार नाही.

अनेकदा डोकेदुखी म्हटलं की आपण साधीशी औषधाची गोळी घेतो अन् दुर्लक्ष करतो. काहीवेळा तर काही जणांना वर्षानुवर्षे डोकेदुखीची (Severe Headaches) समस्या असते. काही लोकांसाठी हे दुखणं काहीवेळा मायग्रेनही असू शकतं. मात्र या व्यतिरिक्त डोकेदुखीचं कारणं ते काय असणार? एखाद्या आजाराशिवाय आपण डोकेदुखीचं इतर काही कारण असेल असा विचार करुच शकत नाही. पण आता डोकेदुखीचं एक असं कारण समोर आलंय ज्यामुळे तुमचं डोकं फिरायची वेळ येईल. हे कारण वाचून तुम्हाला धक्का बसेल पण विश्वास बसणार नाही. 

ही अतिशय विचित्र घटना असली, तरी खरी आहे. चीनमधील एका व्यक्तीला अनेक वर्षांपासून डोकेदुखीची तक्रार होती. सामान्यतः औषधोपचाराने बरं होणाऱ्या या दुखण्यामागील खरं कारण समोर आलं तेव्हा खुद्द या व्यक्तीलाही जबरदस्त धक्का बसला. त्याच्या कवटीत दोन दशकांपासून गोळी अडकली होती, याची त्याला कल्पनाही नव्हती.

शेनजेन इथे राहणाऱ्या या २८ वर्षाच्या व्यक्तीला सतत डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागत असे. हळूहळू वेदना आणखीच वाढत गेल्या आणि त्या वारंवार होऊ लागल्या. सुरुवातीला त्याला वाटलं की झोप व्यवस्थित होत नसल्याने असं होत असावं. मात्र झोप घेऊनही हा त्रास कमी न झाल्याने तो डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याची समस्या ऐकल्यानंतर तपासणी केली असता तेदेखील हैराण झाले. Shenzhen University General Hospital मध्ये व्यक्तीच्या MRI रिपोर्टमधून समजलं की त्याच्या कवटीच्या डाव्या बाजूला धातूची गोळी अडकली आहे.

डॉक्टरांनी रुग्णाला जेव्हा याबद्दल विचारलं, तेव्हा त्याला याबद्दल काही कल्पनाही नव्हती की ही गोळी त्याच्या डोक्यात कशी गेली. अखेर त्याला आठवलं की जेव्हा तो ८ वर्षाचा होता तेव्हा त्याचा भाऊ एअरगनसोबत खेळत होता, चुकून त्याच्याकडून गोळी झाडली गेली. ही गन रुग्णाच्या डोक्यावर ठेवण्यात आलेली होती. यानंतर झालेली दुखापत त्याने आपल्या केसांनी लपवली आणि आई-वडिलांना काहीही सांगितलं नाही. जखमही जास्त खोल नव्हती. त्यामुळे तो स्वतःही याबद्दल विसरून गेला.

डॉक्टरांचं म्हणणं आहे, की या घटनेतून या व्यक्तीचं जिवंत राहणं म्हणजे खरंच एक चमत्कार आहे. १ सेंटीमीटर लांब आणि ०.५ सेंटीमीटर जाड गोळी कवठीमध्ये अडकूनही २० वर्ष जिवंत राहाणं ही मेडिकल सायन्समधील अतिशय अनोखी घटना असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेchinaचीन