चेन्नई : 2क्क्9 मध्ये सशस्त्र संघर्षादरम्यान श्रीलंकेत कथित मानवी हक्काची पायमल्ली झाल्याप्रकरणी र्सवकष चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने तीन तज्ज्ञांच्या नावांची घोषणा केली. संयुक्त राष्ट्राने उचललेल्या पावलाचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडियाने स्वागत केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने पाकिस्तानच्या मानवी हक्क कार्यकत्र्या अस्मा जहांगीर, फिनलँडचे माजी अध्यक्ष आणि शांततेच्या नोबल पारितोषिकाने सन्मानित मारट्टी अहतीसारी आणि माजी गव्हर्नर जनरल आणि न्यूझीलंडच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सिल्व्हिया कार्टराईट यांची नेमणूक केली आहे.
श्रीलंकेतील दीर्घ सशस्त्र संघर्षाच्या अंतिम टप्प्यात काय घडले याबद्दलची माहिती या चौकशीतून मिळेल आणि पीडितांना न्याय आणि मोबदला मिळू शकेल, असे अॅम्नेस्टीने म्हटले आहे.
(वृत्तसंस्था)