लग्नाच्या आधी प्रियकर-प्रेयसी यांच्यात तुझ्यासाठी मी चंद्र, तारका आणीन, असे संभाषण होते; परंतु असा एक देश आहे जेथे मुलीशी लग्न करायचे असेल, तर व्हेल माशाचा दात तोडावा लागतो. तसे न झाल्यास त्या मुलाला त्याच्या आवडीची मुलगी मिळत नाही. फिजी देशात तबुआ नावाच्या या रूढीनुसार मुलाला लग्न करण्यासाठी व्हेल माशाचा दात मुलीच्या वडिलांना द्यावा लागतो. व्हेल मासे खूपच खोल पाण्यात राहतात. कोण वेडा माणूस व्हेल माशाच्या दातासाठी आपला जीव धोक्यात लोटेल व दात घेऊन येईल. तेही प्रेमासाठी; परंतु प्रेमात पडलेले प्रियकर अशी जोखीम घेतात. ही परंपरा आजही लोक पाळतात. ही परंपरा मुलाकडील लोक संपन्न कुटुंबातील आहेत हे दाखवणारी समजतात. मुलगा शेकडो फूट खोल जाऊन जगातल्या सगळ्यात मोठ्या माशाचा दात आणतो तेव्हा तबुआ परंपरेनुसार प्रेम व्यक्त होते.
आवडत्या मुलीसाठी आणावा लागतो व्हेल माशाचा दात
By admin | Published: June 05, 2017 4:20 AM