शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Russia Ukraine conflict : बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय? रशिया-युक्रेन संघर्षात याची का चर्चा? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:11 AM

Russia Ukraine conflict : हा युक्रेनवरील हल्ला नसून विशेष लष्करी कारवाई असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या अनेक भागात लष्करी तळांवर हल्ले होत आहेत.

रशियाने कालपासून युक्रेन विरोधात युद्धाला सुरुवात केली आहे. युक्रेनवर रशियाचे हल्ले (Russian Attacks on Ukraine) तीव्र होत आहेत. युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये  (Kyiv) स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत. हा युक्रेनवरील हल्ला नसून विशेष लष्करी कारवाई असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेनच्या अनेक भागात लष्करी तळांवर हल्ले होत आहेत.

युक्रेनमधून भारतीयांना परत करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. दरम्यान, भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये म्हटले आहे की जर हल्ल्याचे आवाज ऐकू आले तर गुगल मॅपवरून जवळील बॉम्ब शेल्टर्स (Bomb Shelters) शोधा आणि त्याचा सहारा घेण्यात यावा. त्यामुळे बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय? याबाबत जाणून घेऊया...

बॉम्ब शेल्टर्स म्हणजे काय?बॉम्ब शेल्टर्स हा युद्धाच्या शब्दकोशातील एक शब्द आहे. सर्वसाधारण शब्दात, ही एक बंद जागा असते, जी बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांसारख्या स्फोटक शस्त्रांच्या प्रभावापासून लोकांना संरक्षित करण्यासाठी बनविली जाते. हे सहसा एक खोली किंवा क्षेत्र असते जे जमिनीखाली असते, विशेषत: बॉम्बच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले असते, ज्याचा वापर हवाई हल्ल्यांदरम्यान आश्रय म्हणून केला जातो.

बॉम्ब शेल्टर्समध्ये काय असते ?औपचारिक बॉम्ब शेल्टर्समध्ये पिण्याचे पाणी, पॅकेज बंद अन्न, आपत्कालीन औषधे, बॅटरीवर चालणारे रेडिओ, आपत्कालीन फ्लॅश लाइट किंवा टॉर्च, अतिरिक्त बॅटरी इ. अशा अनेक विशेष सुविधा असतात. अशा ठिकाणी किमान तीन दिवसांच्या गरजांसाठी अशाप्रकारे साहित्य साठवले जाते. परंतु सर्वत्र किंवा शहरात औपचारिकपणे बॉम्ब शेल्टर बांधले जात नाहीत. शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत, जी गरज पडल्यास बॉम्ब शेल्टर म्हणून काम करू शकतात किंवा बॉम्ब शेल्टर म्हणून वापरली जाऊ शकतात. सध्या, कीवच्या मेट्रो स्टेशनचा वापर यासाठी केला जात आहे. एवढेच नाही तर उड्डाणपुलाच्या खालच्या भागाच्या कडा काही वेळा बॉम्ब शेल्टर म्हणूनही कामाला येतो.

कीव्हमधील लोकांना धोकाएकीकडे रशियाने असे आश्वासन दिले आहे की, त्यांचे सैन्य केवळ लष्करी तळांवर हल्ले करत आहे आणि नागरिक आणि नागरी अस्थापनांवर हल्ले करत नाही. पण युक्रेनमधील लोकांना धोका असल्याचे वाटत आहे. येथील कीव्हचे लोक शहराच्या भूमिगत मेट्रो स्टेशनमध्ये आश्रय घेत आहेत. हे मेट्रो नेटवर्क देशातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे भूमिगत नेटवर्क आहे, ज्यापैकी बहुतेकांना आधीच बॉम्ब शेल्टर म्हटले जाते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन टेलिव्हिजनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियाने युक्रेनचे हवाई तळ आणि हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचे जाहीर केले आहे. कीव्हसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रेही डागण्यात आली. रशियन सैन्याने अनेक दिशांनी युक्रेनमध्ये प्रवेश केला आहे.

युक्रेनमधील भारतीयांची स्थितीदरम्यान, जे भारतीय नागरिक कीव्हच्या दिशेने येत असतील तर ते ज्या शहरातून येत आहेत, त्यांना त्याच शहरात परत जाण्यास भारतीय दूतावासाने लोकांना सांगितले आहे. युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू झाल्यानंतर मोठ्या संख्येने लोक कीव्हमधील मेट्रो स्टेशनकडे जात आहेत. युक्रेनमध्ये सुमारे 18,000 भारतीय असून त्यापैकी बहुतांश विद्यार्थी आहेत. एअर इंडियाच्या विमानाला युक्रेनला पाठवण्यात आले होते, परंतु युक्रेनमधील व्यावसायिक उड्डाणेसाठी विमानतळ क्षेत्रे बंद झाल्यामुळे त्यांना परतावे लागले. याशिवाय, भारतीय परराष्ट्र मंत्रालय आता युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी इतर पर्यायांवर काम करत आहे. भारतीय दूतावासाच्या मदतीसाठी आणखी लोकांना पाठवले जात आहे. मंत्रालय फोनद्वारे अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहे. सध्या भारतीय विद्यार्थी कोणत्याही संकटात नसल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाInternationalआंतरराष्ट्रीय