शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

शुन्यातलं जगणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 3:51 PM

कोणाला हा वेळ खायला उठलाय, या रिकामपणाचं काय करायचं असा प्रo्न काहींना पडलाय, तर हे शांत, थांबलेलं, शुन्यातलं आयुष्य अनेक जण अक्षरश: जगून घेताहेत. कारण त्यांनाही माहीत आहे, आज जरी हे जग थंडावलेलं असलं, तर काही काळानं याचा वेग पहिल्यापेक्षा जास्त, अगदी दुपटीवर जाऊन पोहोचेल.

ठळक मुद्देया सक्तीच्या विर्शांतीच्या काळात खेळाडू काय करताहेत? 

लोकमत-

कोरोनामुळे जगभरातल्या लोकांचं आयुष्य थंडावलं आहे. एका क्षणात हा वेग जणू शुन्यावर आला आहे. कोणाला हा वेळ खायला उठलाय, या रिकामपणाचं काय करायचं असा प्रo्न काहींना पडलाय, तर हे शांत, थांबलेलं, शुन्यातलं आयुष्य अनेक जण अक्षरश: जगून घेताहेत. कारण त्यांनाही माहीत आहे, आज जरी हे जग थंडावलेलं असलं, तर काही काळानं याचा वेग पहिल्यापेक्षा जास्त, अगदी दुपटीवर जाऊन पोहोचेल.या सक्तीच्या विर्शांतीच्या काळात खेळाडू काय करताहेत? मैदानावर घाम गाळण्याशिवाय गत्यंतर नसलेल्या खेळाडूंनाही आता घरी बसण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ‘एनबीए’ (नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन) ही जगभरात मान्यता असलेली बास्केटबॉलची मोठी लिग. त्यातले स्टार सध्या काय करताहेत, म्हणून त्यांचा आढावा घेतला. हे खेळाडूही आता आपलं आयुष्य एका वेगळ्या अर्थानं जगून घेताहेत. पर्सनल लाइफ नसलेले हे खेळाडू वेळेअभावी अगदी साध्या साध्या गोष्टीही करू शकले नव्हते. त्या गोष्टी ते आता करताहेत. डॅनी ग्रीन हा आघाडीचा खेळाडू म्हणतो, माझ्या व्यस्त दिनक्रमामुळे माझ्या गर्लफ्रेंडला देण्यासाठीही माझ्याकडे वेळ नव्हता. आता मी तिला भरपूर वेळ देतोय. बास्केटबॉलच्या कोर्टवर जाता येत नाही, याची अस्वस्थता आहेच, पण पर्सनल आयुष्यालाही आणि ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे, त्यांनाही वेळ द्यायचा असतो, हे मला आज उमगलं. लेब्रॉन जेम्स म्हणतो, माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत मी बास्केटबॉलपटूच राहीन, पण आता भूतकाळातही मी डोकावून पाहतोय. त्यामुळेच आपल्या शाळकरी वेळेपासूनच्या सगळ्या आठवणी त्यानं जाग्या केल्यात. भूतकाळातले सुंदर सोनेरी क्षण आठवताना त्यावेळचे फोटो, व्हीडीओ पुन्हा एकदा पाहिले. सोशल मीडीयावर शेअर केले. रोनाल्डोपासून ते नेमारपर्यंत आपल्या आवडत्या फुटबॉलपटूंचे व्हीडीओ एकामगोमाग एक पाहताना स्वत:ला त्यात गुंतवून टाकलं. क्विन कुकनं आपल्या वर्कआऊटकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं. पुशअप्सपासून तर इतरही शारीरिक कसरतींचे जे चॅलेन्जेस त्यानं घेतले होते, त्याचे व्हीडीओ एकमेकांना शेअर केले. कुक म्हणतो, आजच्या कठीण काळात आपल्या प्रत्येकाची काही जबाबदारी आहे. आपण ती नीट निभावलीच पाहिजे. पण एक मात्र खरं, तुम्ही कितीही मोठे असा, प्रत्येकाला या साथीनं अगदी सामान्य करून टाकलं आहे. सर्वांना एकाच पातळीवर आणताना लहान-मोठा हा भेदही मिटवून टाकला आहे.