प्रश्न: माझा पासपोर्ट चोरीला गेला आहे. त्यात अमेरिकेचा वैध व्हिसा होता. आता मी काय करावं? माझ्या हरवलेल्या व्हिसाची तक्रार कशी करावी?उत्तर: तुम्ही तुमच्या हरवलेल्या पासपोर्टची माहिती स्थानिक प्रशासनाला आणि अमेरिकन दूतावासाला द्यावी. तुमची ओळख सुरक्षित राखण्यासाठी आणि अमेरिकेच्या नव्या व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी हरवलेल्या व्हिसाची माहिती देणं गरजेचं आहे. (what to do after passport with valid US visa got stolen )सर्वप्रथम घटना घडली तिथल्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा. नेमकं काय घडलं याची माहिती असणाऱ्या एफआयआरची प्रत पोलिसांकडून घ्या. पोलीस तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला व्हिसा जारी करणाऱ्या दूतावासाला या घटनेची माहिती द्या. त्यांना पोलीस तक्रारीची प्रत दाखवा. यासाठी तुम्ही india@ustraveldocs.com वर ई-मेलदेखील करू शकता. नेमका काय प्रकार घडला याची माहिती ई-मेलमध्ये द्या. सोबत तुमच्या हरवलेल्या पासपोर्ट, हरवलेल्या व्हिसा आणि पोलीस तक्रारीचे फोटो जोडा.तुम्ही अमेरिकेतच असल्यास, तुम्ही याची माहिती होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटला द्यायला हवी. यानंतर तुम्ही https://www.uscis.gov/i-102 वर जाऊन I-102 अर्ज भरून रिप्लेसमेंट अरायव्हल/डिपार्चर रेकॉर्ड मिळवायला हवा.हरवलेले किंवा चोरीला गेलेले अमेरिकन व्हिसा पुन्हा जारी केले जात नाहीत. तुम्हाला अमेरिकेला प्रवास करायचा असल्यास नव्या नॉनइमिग्रंट व्हिसासाठी पुन्हा अर्ज करावा लागतो आणि व्हिसा अर्ज शुल्क भरावं लागतं. तुम्ही www.ustraveldocs.com/in वर जाऊन नव्या व्हिसासाठी अर्ज करू शकता. नेहमीच्या व्हिसा ऑपरेशन्ससाठी दूतावास सध्या बंद आहे याची नोंद घ्या. याबद्दलची माहिती आमच्या वेबसाईटवर अपडेट केली जाईल. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असल्यास ते india@ustraveldocs.com वर ई-मेल करा. तुम्ही पुढील व्हिसा मुलाखतीला येताना तुमच्या जुन्या पासपोर्टची प्रत (उपलब्ध असल्यास) आणि पासपोर्ट हरवल्याची पोलीस तक्रारीची मूळ प्रत घेऊन या.प्रवाशांनी त्यांच्या पासपोर्टमधील बायोग्राफिक माहिती असलेल्या पानाची, अमेरिकेच्या व्हिसाची आणि ऍडमिशन स्टॅम्पची प्रत अमेरिकेत आल्यानंतर तयार करावी आणि एका सुरक्षित ठिकाणी ठेवावी असा सल्ला आम्ही देतो.सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.
US Visa: अमेरिकेचा वैध व्हिसा असलेला पासपोर्ट चोरीला गेल्यास काय करावं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 11:04 AM