शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नैमल अशी कशी दिसते? आधी ‘अशी’ नव्हती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 7:57 AM

नैमलला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. नुसत्या इन्स्टाग्रामवरच तिचे २० लाख फॉलोअर्स आहेत.

पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे कोणत्या कारणावरून कधी वादंग पेटेल आणि लोक कशावरून भांडायला लागतील, वादविवाद, चर्चा करायला लागतील याचा नेम नाही. घरात खायचे वांधे, पण कोण काय करतंय, कोण काय म्हणतंय, त्याच्या पर्सनल लाइफमध्ये काय चाललंय याविषयी त्यांना फारच रस. त्यातही कोणी सेलिब्रिटी असला, तर पाकिस्तानी लोक त्याच्या मागे हात धुऊन लागतात. एखाद्याला इतकं डोक्यावर घेतील आणि त्यालाच नंतर इतक्या जोरात आपटतील की ज्याचं नाव ते.. 

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानपासून ते त्यांची माजी पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ, इमरान यांच्या इतर पत्नी, प्रेयसी, त्यांची प्रेमप्रकरणं.. हे तिथे नेहमीच चर्चेत असणारं प्रकरण. याशिवाय इतर सेलिब्रिटींच्या खासगी गोष्टीही पाकिस्तानी नागरिकांनी इतक्या चघळल्या की त्याशिवाय त्यांना जणू दुसरा विषयच नसावा. अर्थात रोजच्या जगण्याची भ्रांत असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना याच गोष्टी त्यांच्या जगण्यासाठी, त्यांचं दु:ख कमी करण्यासाठी साहाय्यभूत ठरत असतात. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनाही तेच हवं असतं. स्वत:ला अडचणीच्या ठरणाऱ्या मुद्द्यांपासून पाकिस्तानी नागरिक भरकटले तर त्यांच्यासाठीही ते चांगलंच असतं..

पाकिस्तानी नागरिकांना आपलं दु:ख, वेदना विसरण्यासाठी सध्या एक नवं कारण मिळालं आहे. हे कारण आणि ती व्यक्ती आहे पाकिस्तानची अभिनेत्री नैमल खावर! नैमलनं प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे ‘संस्कृती बुडवल्याचा’ आरोप तिच्यावर होतो आहे आणि त्या कारणानं सोशल मीडिया तिच्यावर अक्षरश: तुटून पडलं आहे. प्लास्टिक सर्जरी करून नैमलनं आपल्या देशाच्या संस्कृतीची लक्तरं वेशीवर टांगली, देशाच्या संस्कृतीचं रक्षण करणं तर सोडा, पण असे ‘येडे चाळे’ करून ती पाश्चात्त्य संस्कृतीचा उदो उदो करते आहे. त्यामुळे तिला  तुरुंगात टाकलं पाहिजे, पाकिस्तानातून तिला हाकलून दिलं पाहिजे.. इथपर्यंत अनेक जहाल प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

याच नैमलला काही काळापूर्वी पाकिस्तानी नागरिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं. तिचा पहिलाच चित्रपट ‘वरना’. या चित्रपटातील तिची भूमिका आणि तिचं सौंदर्य यामुळे पब्लिक अक्षरश: पागल झाले होते. ‘अना’ ही तिची पहिली टीव्ही सिरियलही पाकिस्तानात अतिशय लोकप्रिय झाली होती. मात्र त्यानंतर थोड्याच कालावधीत तिनं लग्नाचा निर्णय घेतला. पाकिस्तानी अभिनेता हाजमा अली अब्बासी याच्याबरोबर तिचा निकाह झाला आणि जे इतर सर्वसामान्य महिलांचं होतं, तेच तिचंही झालं.

पाकिस्तानात अनेक महिलांना लग्नानंतर आपल्या करिअरवर पाणी सोडावं लागतं. लग्नानंतर नैमलनंही अभिनयाला रामराम ठोकला. चित्रपट, सिरिअल्स यापासून ती दूर झाली, मात्र मॉडेलिंग म्हणून ती काम करीतच राहिली. अजूनही करतेय. त्यामुळे तिच्या लोकप्रियतेत थोडीही घट झाली नाही, उलट ती वाढतच गेली. कारण सोशल मीडियावरून ती कायमच आपल्या चाहत्यांशी जोडलेली असते. कधी फोटो शेअर कर, कधी व्हिडिओ टाक, कधी कमेंट्स कर.. यामुळे ती कायमच चाहत्यांच्या ‘संपर्का’त होती. पण अलीकडेच तिनं तिचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताच, तिच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला आणि त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. 

नैमल खावर एक अभिनेत्री तर आहेच, त्याचबरोबर ती व्हिज्युअल आर्टिस्ट आहे, पेंटर आहे आणि सोशल ॲक्टिव्हिस्टही आहे. तिनं शेअर केलेले फोटो पाहून अनेक युजर्सनी आश्चर्य व्यक्त करताना म्हटलं, अरे, नैमल अशी कशी दिसतेय? ती इतकी कशी काय बदलली? नैमलनं नाकाची प्लास्टिक सर्जरी केल्याचं आणि ओठांनाही ‘फिलिंग’ केल्याचं म्हटलं जातंय. मुळात तिनं खरंच प्लास्टिक सर्जरी केलीय का, हे अजूनही निश्चित नाही, पण तिचं बदललेलं रंगरूप पाहूनच लोकांनी तिच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केलीय. तिच्याबाबतच्या नकारात्मक प्रतिक्रियांचा सोशल मीडियावर पूर आलाय. नैमलचा बचाव करायला तिचे कुटुंबीय पुढे आले, पण त्यांनाही लोकांचा संताप बघून गप्प बसावं लागलं.

‘बायकोला ताब्यात ठेव’!नैमलला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. नुसत्या इन्स्टाग्रामवरच तिचे २० लाख फॉलोअर्स आहेत. नैमलची नणंद डॉ. फजिला अब्बासी हीदेखील सेलिब्रिटी त्वचारोग तज्ज्ञ आहे. तिनंच नैमलचं रंगरूप बदलल्याची काहींना शंका आहे. त्यामुळे तिला आणि नैमलच्या नवऱ्यालाही लोकांनी झोडपून काढलं आहे. ‘बायकोला ताब्यात ठेव, जोरू का गुलाम मत बन..’ म्हणून नैमलच्या नवऱ्याचेही लोकांनी कान टोचले आहेत!..

टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी