शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

US Visa: अमेरिकेच्या नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी आपत्कालीन अपॉईंटमेंट कशी मिळू शकेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 2:43 PM

US Visa: जाणून घ्या नॉन-इमिग्रंट व्हिसासाठीचे महत्त्वाचे नियम आणि प्रक्रिया

प्रश्न: नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी आपत्कालीन अपॉईंटमेंट मिळत असल्याचं मी ऐकलं. या अपॉईंटमेंटचं स्वरुप कसं असतं आणि ती मला कशी मिळू शकेल? (what is emergency appointments for a non immigrant US visa how i qualify for one)उत्तर: एखाद्या आकस्मिक कारणामुळे प्रवास करावा लागत असल्यास आणि ते कारण खाली देण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत असल्यास तुम्ही त्वरित अपॉईंटमेंटसाठी पात्र ठरू शकता. मात्र ही अपॉईंटमेंट देताना दूतावास किंवा वाणिज्य दूतावासातील वेळेची उपलब्धता लक्षात घेतली जाते. त्वरित अपॉईंटमेंटसाठी अर्ज करताना किंवा या अपॉईंटमेंटला जाताना कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. मात्र तुम्ही त्यासाठीच्या निकषांमध्ये बसणं महत्त्वाचं असतं. तुमचा प्रवास तातडीचा आहे याचे कागदोपत्री पुरावे दाखवणं गरजेचं आहे. तातडीचा प्रवास करण्यासाठी चुकीचं कारण दाखवलं असल्याचं मुलाखतीत उघड झाल्यास तुमच्या व्हिसा अर्जावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. खालील परिस्थितींमध्ये तुम्ही तातडीच्या अपॉईंटमेंटसाठी पात्र ठरू शकता.

- तुमची तातडीची वैद्यकीय गरज (किंवा नातेवाईकाची किंवा नियोक्त्याची)- तुमच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू- तातडीचा व्यवसायिक प्रवास- विद्यार्थी किंवा अभ्यागत प्रवास विनिमय, जर तुमचा कार्यक्रम ६० दिवसांच्या आत सुरू होणार असल्यास आणि नियमित अपॉईंटमेंट उपलब्ध नसल्यास

तातडीच्या अपॉईंटमेंटसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी कृपया https://www.ustraveldocs.com/in/expedited-appointment.html संकेतस्थळाला भेट द्या. लग्नसोहळ्यात, पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी, बाळंत नातेवाईकाला मदत करण्यासाठी, वार्षिक व्यवसायिक, शैक्षणिक, प्रोफेशनल परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी, शेवटच्या क्षणी पर्यटनाचा आनंद मिळवण्यासाठी तुम्हाला तातडीची अपॉईंटमेंट मिळू शकणार नाही. ही कारणं तातडीच्या अपॉईंटमेंटसाठी पात्र ठरत नाहीत. अशा स्वरुपाच्या प्रवासासाठी पुरेसे दिवस आधीच नियमित व्हिसा अपॉईंटमेंट घ्या. हे करत असताना आम्ही नियमित सेवा सुरू केली नसल्याची बाब लक्षात ठेवा.

तातडीच्या अपॉईंटमेंटसाठी विनंती करण्यासाठी, नॉनइमिग्रंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन डीएस-१६० अर्ज (तो तुम्हाला https://cgifederal.secure.force.com या लिंकवर सापडेल) भरून नियमित अर्ज प्रक्रिया पूर्ण करायला हवी आणि लागू असलेलं शुल्क भरायला हवं. तातडीच्या तारखेसाठी अर्ज करण्याआधी तुम्ही उपलब्ध असलेली पहिली अपॉईंटमेंट नक्की करायला हवी. तुम्ही अपॉईंटमेंटसाठी वेळ नक्की करत असताना, तुम्हाला सर्वात जवळच्या अपॉईंटमेंटच्या तारखेचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. त्यात सध्या उपलब्ध असलेल्या तातडीच्या अपॉईंटमेंट्स असतील. 

तातडीचा अपॉईंटमेंट अर्ज करून तुम्हाला पुढे जायचं असल्यास तातडीचा विनंती अर्ज भरा. तातडीची अपॉईंटमेंट मिळण्याच्या निकषात बसणारं कारण त्यात नमूद करा. तुम्ही विनंती केल्यानंतर दूतावास किंवा वाणिज्य दूतावासाकडून येणाऱ्या ईमेल प्रतिसादाची वाट पाहा. दूतावास किंवा वाणिज्य दूतावासानं तुमची विनंती अमान्य केल्यास आणि त्यानंतर परिस्थितीत बदल होऊन ती आपत्कालीन स्वरुपाची झाल्यास नव्या माहितीसह पुन्हा विनंती करण्याची एक संधी तुमच्याकडे असते. दूतावास किंवा वाणिज्य दूतावासानं तुमची आपत्कालीन अपॉईंटमेंटसाठीची विनंती मान्य केली, तर तुम्ही तुमची तातडीची अपॉईंटमेंट मेलमध्ये देण्यात आलेल्या सुचनांनुसार नक्की करू शकता. तुम्हाला काही तांत्रिक प्रश्न असल्यास, तुम्ही मार्गदर्शनासाठी कॉल सेंटरशी संपर्क साधू शकता. पण ते स्वत:हून विनंती करू शकत नाहीत.

तुम्ही एकदा तातडीची अपॉईंटमेंट नक्की केली, त्यानंतरची पुढील प्रक्रिया नियमित व्हिसा अपॉईंटमेंटपेक्षा वेगळी नसते. तातडीची अपॉईंटमेंट मिळाल्यावर व्हिसा मिळेलच असं नाही.सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

 

टॅग्स :Visaव्हिसाAmericaअमेरिका