What is Nuclear Dirty Bomb: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १२ वा दिवस आहे. युद्ध अजूनही थांबलेलं नाही आणि दिवसेंदिवस दोन्ही देशांसह संपूर्ण जग या युद्धात होरपळून निघत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या इतर देशांच्या नागरिकांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशियानं आज अखेर युक्रेनच्या चार शहरांमध्ये तात्पुरत्या युद्ध विरामाची घोषणा केली आहे. युद्धाविरामाअंतर्गत एक सेफ कॉरिडिओर तयार करण्यात येत असून यामाध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचं संबंधित ठिकाणाहून स्थलांतर केलं जाणार आहे. पण युद्धाबाबत रशियाचं मत अजूनही ठाम आहे. जोवर युक्रेन माघार घेत नाही तोवर कारवाई सुरुच ठेवण्याचा पुतीन यांचा इरादा आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी याधीच देशाच्या अण्वस्त्र विभागाला सज्ज राहण्याचे आदेश दिलेले आहेत. यातच रशियानं युक्रेननं डर्टी बॉम्ब बनवल्याचा आरोप केला आहे. पण याचा कोणताही पुरावा रशियानं दिलेला नाही. डर्टी बॉम्ब म्हणजे नेमकं काय? आणि रशियानं नेमका काय दावा केला आहे हे आपण जाणून घेऊयात.
डर्टी बॉम्ब म्हणजे काय?यूएस हेल्थ एजन्सी सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या मते, डर्टी बॉम्ब हे अनेक धोकादायक गोष्टींचे मिश्रण आहे. जसं की, डायनामाइट, किरणोत्सर्गी पावडर आणि गोळ्या. त्याचा परिणाम दूरवर होतो.
रिपोर्टनुसार, जेव्हा हा डर्टी बॉम्ब फुटतो तेव्हा खूप जोरदार स्फोट होतो. स्फोटाचा परिणाम ज्या त्रिज्यामध्ये होतो त्या ठिकाणी किरणोत्सर्गी घटक पसरतात. हे रेडिओलॉजिकल डिस्पेर्सल डिव्हाइस म्हणून देखील ओळखले जातात.
धोका किती?सीडीसीच्या अहवालानुसार, सर्वाधिक नुकसान डर्टी बॉम्बच्या स्फोटामुळे होते, त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळे नाही. जिथं डर्टी बॉम्बचा स्फोट होतो, तिथं गंभीर आजाराने लोक त्रासतात. मैदान आणि तिथे उपस्थित असलेल्या वस्तूंचे खूप नुकसान होते. तथापि, स्फोटादरम्यान, त्यातून बाहेर पडणारी प्रतिक्रियाशील धूळ आणि धूर दूरवर पसरतो आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना उपचार आणि काळजी घेणे आवश्यक होऊन जाते. याशिवाय बाधित भागातील खाद्यपदार्थ आणि पिण्याच्या पाण्यातही संसर्ग होतो.
डर्टी बॉम्बपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?डर्टी बॉम्बचे परिणाम टाळण्यासाठी, सामान्य माणूस त्याच्या स्तरावर काही प्रमाणात बचाव करू शकतो. उदाहरणार्थ, जिथं असा स्फोट झाला असेल, तिथून दूर जावं. तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर घरातच रहा. रेडिओ आणि टीव्हीशी कनेक्ट रहा. त्यादरम्यान, बाधित क्षेत्रातील लोकांना जे काही सूचना दिल्या जात आहेत त्याचे पालन करा.
रशियाने आता काय म्हटले आहे ते जाणून घ्यारॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियन मीडियाने एका अज्ञात स्त्रोताच्या हवाल्याने दावा केला आहे की युक्रेन प्लुटोनियमवर आधारित अण्वस्त्र 'डर्टी बॉम्ब' बनवण्याच्या जवळ आहे. मात्र, या दाव्याला पुष्टी देणारा कोणताही पुरावा अहवालात देण्यात आलेला नाही. अहवालानुसार, युक्रेन चेरनोबिल अणुऊर्जा प्रकल्पात अण्वस्त्रे तयार करणार होता.