कशाचे संकेत? हा देश शीतयुद्धात उभारलेले हजारो विशाल बंकर्स कार्यन्वित करू लागला; सोव्हिएतचा होता मित्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 23:51 IST2025-03-30T23:50:37+5:302025-03-30T23:51:24+5:30
Russia War: जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सैन्य बंकर्स असलेला देश नॉर्वे पुन्हा एकदा आपले बंकर्स कार्यन्वयीत करू लागला आहे. बंद ठेवलेल्या बंकर्सची साफसफाई केली जात आहे.

कशाचे संकेत? हा देश शीतयुद्धात उभारलेले हजारो विशाल बंकर्स कार्यन्वित करू लागला; सोव्हिएतचा होता मित्र
दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या अमेरिका आणि सोव्हिएत रशियामधील शीतयुद्धामुळे युरोपियन देशांनी हजारो बंकर्स निर्माण केले होते. प्रत्येक देश आपली लष्करी शक्ती वाढविण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. सर्वाधिक बंकर्स असलेला देश हा अल्बानिया हा आहे. आता पुन्हा मोठ्या युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाच्या भीतीने युरोपीय देश आपल्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करू लागले आहेत.
जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सैन्य बंकर्स असलेला देश नॉर्वे पुन्हा एकदा आपले बंकर्स कार्यन्वयीत करू लागला आहे. बंद ठेवलेल्या बंकर्सची साफसफाई केली जात आहे. युरोप पुन्हा एकदा युद्धात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फ्रान्सनेही लष्करी ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार शीतयुद्धावेळी नॉर्वेने हजारो बंकर्स उभारले होते. यामध्ये लढाऊ विमाने, जहाजे देखील लपविण्यात आली होती. आता रशियासोबतच्या तणावामुळे पुन्हा हे बंकर्स चर्चेत येऊ लागले आहेत. शीतयुद्ध संपले तरी हे बंकर्स पर्यटकांच्या किंवा सामान्य नागरिकांच्या नजरेसही पडू देण्यात आलेले नाहीत. दर वर्षी हजारो पर्य़टक उत्तर नॉर्वेमध्ये येतात. परंतू, हे विशालकाय भांडार कोणाच्याही नजरेस पडलेले नाही.
नॉर्वेमध्ये खूप मोठेमोठे भूमिगत बंकर्स आहेत. डोंगररांगांमध्ये ते खोदण्यात आले आहेत. यामध्ये नॉर्वेच्या सैन्यासह मित्र देशांचे सैन्य लपू शकत होते. पूर्वेकडील युक्रेन आता रशियाच्या ताब्यात जाऊ लागला आहे. यामुळे नॉर्वे आपले हे बंकर्स पुन्हा कार्यन्वयीत करू लागला आहे. कधीकाळी रशियाचा मित्र राहिलेल्या नॉर्वेला रशियाच आपल्यावर ताबा मिळविण्यासाठी हल्ला करू शकतो अशी भीती वाटत आहे. नॉर्वेवर कब्जा केला तर आर्कटिकमध्ये रशियाची ताकद वाढू शकते. यामुळे नॉर्वे आपली ताकद वाढवू लागला आहे.