ऑरलँडो, दि. २६ - खरे प्रेम मिळवायचे असेल तर काही पण कोणताही त्याग करण्याची तयारी ठेवावी लागले. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सत्या नाडेला यांनाही याचा अनुभव आला होता. अमेरिकेतील कायमस्वरूपी वास्तव्यासाठी मिळणारे ग्रीनकार्ड त्यांच्या नवविवाहित पत्नीला अमेरिकेत नेण्यासाठी अडसर ठरू लागले होते. त्यामुळे पत्नीला अमेरिकेत नेण्यासाठी नाडेला यांना चक्क अमेरिकेच ग्रीन कार्ड परत करावे लागले होते. मायक्रोसॉफ्टमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या नाडेला यांना अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी ग्रीन कार्ड मिळाले होते. मात्र अमेरिकी कायद्यानुसार कुठल्याही ग्रीन कार्डधारकाने विवाह केल्यास त्याची पत्नी वा पतीचा व्हीसा रद्द केला जातो. त्यामुळे आपल्या नवविवाहित पत्नीसाठी मायक्रोसॉफ्टमधील नोकरीचा राजीनामा देऊन भारतात जाण्याचा गांभीर्याने विचार सुरू केला होता. नाडेला यांच्या या निर्णयावर मायक्रोसॉफ्ट परिसरात त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा देताना नाडेला यांनी ही माहिती आपले पुस्तक हिट रिफ्रेशमधून समोर आणली आहे. हे पुस्तक आज अमेरिकेत प्रकाशित झाले आहे. अमेरिकेतील या नियामामुळे नाडेला यांना आपल्या पत्नीला अनू हिला सिएटल येथे आणता येत नव्हते. "अमेरिकेत काम करत असताना एच१ बी व्हिसा तुम्हाला तुमच्या जोडीदारात अमेरिकेत आणण्याची परवानगी देतो. पण ग्रीन कार्ड तशी परवानगी देत नाही. त्यामुळे मी ग्रीन कार्ड परत करून एच१ बी व्हिसासाठी अर्ज केला. त्यानंतर मी माझ्या पत्नीला अमेरिकेत घेऊन जाण्यास यशस्वी झालो."
प्रेमासाठी काय पण! पत्नीसाठी सत्या नाडेला यांनी परत केले होते अमेरिकेचे ग्रीन कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 11:00 PM