प्रश्न: मुंबईतील अमेरिकेचा दूतावास अमेरिकेला जाणाऱ्या व्यवसायिक विमानाचं तिकीट बुक करण्यासाठी मला मदत करू शकतो का? अमेरिकेत पोहोचल्यानंतर क्वारंटिन प्रक्रिया कशी असेल?उत्तर: अमेरिकेला जाणाऱ्या व्यवसायिक विमानाचं तिकीट बुक करण्यासाठी अमेरिकेचा मुंबईतला दूतावास तुम्हाला मदत करू शकत नाही. अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांनी यासाठी थेट व्यवसायिक एअरवाईन्सशी संपर्क साधावा. दूतावास तिकीट जारी करण्यासाठी एअरलाईन्सला कोणतंही पत्र किंवा प्रमाणपत्र देऊ शकत नाही.अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी तुमच्याकडे अमेरिकेचा वैध व्हिसा, वैध ग्रीन कार्ड आणि वैध पासपोर्ट असायला हवा. तुमचा व्हिसा नेमका कधीपर्यंत वैध आहे, याची तारीख तुम्ही व्हिसावर तपासू शकता. अमेरिकेचे इमिग्रेशन कायदे पाहता वैध व्हिसाच्या आधारावर प्रवाशाला अमेरिकेत प्रवेश मिळेलच याची खात्री देता येत नाही. व्हिसामुळे प्रवाशाला अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचता येतं. मात्र अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय अमेरिकेचे कस्टम आणि बॉर्डर प्रोटेक्शन अधिकारी घेतात. प्रवासी किती दिवस अमेरिकेत राहू शकतो, याचा निर्णय घेण्याचा अधिकारदेखील त्यांनाच असतो.अमेरिकेला पोहोचण्याआधी प्रवाशांनी प्रत्येक राज्याच्या कोविड संबंधित मार्गदर्शक सूचना लक्षात घ्याव्या. क्वारंटिन आणि सेल्फ आयसोलेशनचे नियम राज्यांनुसार बदलतात. प्रत्येक राज्यानं प्रवेशाच्या नियमावलीची माहिती संकेतस्थळावर दिली आहे. क्वारंटिन आणि चाचणी प्रक्रियेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशनच्या संकेतस्थळाला (cdc.gov) भेट द्या.अमेरिकेत प्रवेश केल्यावर प्रवाशांचं स्क्रीनिंग केलं जातं. त्यावेळी त्यांना तिथे वैद्यकीय इतिहास, सध्याची परिस्थिती आणि स्थानिक आरोग्य यंत्रणेबद्दलच्या संपर्काबद्दलची माहिती विचारली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो.नियमावली आणि मार्गदर्शक सूचना कधीही बदलू शकतात याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. प्रवासाबद्दलच्या मार्गदर्शक सूचनांची अपडेटेड माहिती जाणून घेण्यासाठी travel.state.gov ला भेट द्या आणि भारताशी संबंधित नियमावली जाणून घेण्यासाठी in.usembassy.gov/covid-19-information/ ला भेट द्या.
अमेरिकेत पोहोचल्यानंतरची नेमकी क्वारंटिन प्रक्रिया काय?
By कुणाल गवाणकर | Published: October 03, 2020 8:39 PM