नवी दिल्ली - उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनने देशाला युद्धाच्या उंबरठयावर नेऊन ठेवलं आहे. पण किमला याची कोणतीही चिंता नसून आपण कोणाचीही पर्वा करत नसल्याचे त्याने दाखवून दिलं आहे. उत्तर कोरियामध्ये सध्या वॉसाँग-15 या नव्या क्षेपणास्त्राचा कौतुक सोहळा सुरु आहे. उत्तर कोरियाच्या किम संग चौकात शुक्रवारी वॉसाँग-15 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले.
उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडाँग सिनमन या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर या सेलिब्रेशनचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले होते. उत्तर कोरियाच्या दिवंगत नेत्यांचे फोटो लावून या संपूर्ण चौकाची सजावट करण्यात आली होती. किम संग चौकात जमलेल्या नागरीकांची नाचगाणी एकूणच आंनदोत्सव सुरु होता.
वॉसाँग-15 च्या यशस्वी चाचणीने उत्तर कोरियाची महानता आणि ताकत संपूर्ण जगाला कळली असा संदेश एका फलकावर लिहिलेला होता. वॉसाँग-15 हे एक दीर्घ पल्ल्याचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे. आता संपूर्ण अमेरिका आपल्या क्षेपणास्त्रांच्या रेंजमध्ये आली असून अण्वस्त्र हल्ला करु शकतो असा उत्तर कोरियाने दावा केला आहे. शुक्रवारच्या या सेलिब्रेशन सोहळयाला किम जोंग अनुपस्थित होता पण लष्कर आणि पक्षाचे नेते उपस्थित होते.
दहशतवादाला पाठिंबा देणा-या देशांच्या यादीत आता उत्तर कोरियासुद्धाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक नवी घोषणा केली आहे. उत्तर कोरियाला दहशतवादाचं समर्थन(sponsor of terrorism) करणा-या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकण्यात आलं आहे. 9 वर्षांपूर्वीसुद्धा उत्तर कोरियाचं नाव या यादीत टाकण्यात आलं होतं. त्यानंतर जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देश असल्याचं जाहीर केलं आहे. खरंतर हे आधीच करायला हवं होतं, असंही ट्रम्प म्हणाले आहेत.
उत्तर कोरियाने फक्त युद्ध जरी पुकारलं तरी होईल लाखो लोकांचा मृत्यू उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.