प्रश्न- काही दिवसांपूर्वीच मी मुंबईतल्या अमेरिकेच्या वकिलातीत टुरिस्ट व्हिसासाठी मुलाखत दिली. माझा पासपोर्ट अद्यापही वकीलातीतच असल्याची माहिती मला ऑनलाइन समजली. आता मला बिझनेस निमित्त सिंगापूरला जायचंय. मला वकिलातीतून पासपोर्ट कसा मिळेल?
उत्तर- अशा परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी वकिलातीशी संपर्क साधा. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट हवा असल्यास support-india@usatraveldocs.com यावर मेल करा.
येत्या काही दिवसांत तुम्हाला पासपोर्टची आवश्यकता भासणार असल्यास मुलाखती दरम्यान याची कल्पना वकिलातीतल्या अधिकाऱ्याला द्या. मग तुम्हाला तुमचा पासपोर्ट परत दिला जाईल. प्रशासकीय प्रक्रियेमुळे तुमचा अर्ज रद्द झाल्यास दौरा आटपून परत आल्यानंतर तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करू शकता. प्रवास पूर्ण करून आल्यानंतर तुम्ही पासपोर्ट कसा जमा करू शकता. याबद्दलच्या सूचना तुम्हाला दिल्या जातात.
मुलाखती नंतर लगेचच तुम्हाला पासपोर्ट हवा असल्यास support-india@usatraveldocs.com या इमेलवर तशी विनंती करा. तुम्हाला तुमचा पासपोर्ट का हवा आहे याची माहिती त्यात द्या. याबद्दलची सविस्तर माहिती दिल्यास तुमची परिस्थिती अधिकाऱ्यांना व्यवस्थित समजेल. पासपोर्ट लवकर मिळावा याची विनंती इमेलच्या माध्यमातून करा. तुम्ही जितक्या लवकर वकिलातीकडे विनंती कराल, तितक्या लवकर तुम्हाला पासपोर्ट मिळेल. तुमचा इमेल वकिलातीला मिळताच तुम्हाला पासपोर्ट परत करण्याची प्रक्रिया सुरू होते. तुम्ही निवडलेल्या माध्यमातून (कुरिअर किंवा व्हीएसिमधून पिकअप) तुम्हाला पासपोर्ट दिला जातो. तुम्ही परदेशातून परतल्यावर पासपोर्ट व्हीएसीमध्ये जमा करा. त्यामुळे पुढची प्रक्रिया सुरू होईल.
कौटुंबिक किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास आणि त्यासाठी व्हिसाची गरज असल्यासदेखील अर्जदाराने याच प्रक्रियेचा वापर करावा. पासपोर्टशी संबंधित कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास support-india@usatraveldocs.com वर संपर्क साधा.