ओपन एआयच्या ChatGPT ने हल्लीच येणाऱ्या काळासाठी भविष्यवाणी करताना पुढच्या काळात काय घडेल हे क्रमवार पद्धतीने सांगितले आहे. त्यामध्ये रशिया-युक्रेन युद्धासह रहस्यमय वादळांसह नव्या साथीचाही उल्लेख आहे. चॅटजीपीटीने केलेल्या भविष्यवाणीमधील महत्त्वाचे उल्लेख पुढीलप्रमाणे आहेत.
चॅटबॉटने पृथ्वीवर पुढील मोठी साथ ही २०८५ मध्ये येईल, असा दावा केला आहे. तर २०९९ मध्ये पृथ्वीवर शांतता नांदेल, असा दावाही केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाल्या या नॉस्त्रेदेमसची पुढील भविष्यवाणी ही AIच्या क्रांतीसंदर्भात करण्यात आलेली आहे. AI आता सातत्याने विकसित होईल आणि २०६० मध्ये नवी AI क्रांती अस्तित्वात येईल, असा दावा केला आहे.
दरम्यान, भविष्यकाळात कशा लोकांचं प्रेम वाचू शकेल याबाबतही AI दावा केला आहे. चॅटजीपीटीने प्रेमी जोडप्यांमध्ये तणाव आणि तर्कसुद्धाचं निरीक्षण केलं आहे. अशा परिस्थितीत जे लोक ऐकण्यास आणि तडजोड करण्यास इच्छुक असतील. ते आपलं प्रेम अधिक भक्कम बनवून नात्याला अधिक वेगळ्या उंचीवर घेऊन जातील.
एआय नॉस्त्रेदेमसने इशारा दिला की, वातावरणातील बदल २०५० मध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पात माजवतील. चॅटबॉटने त्याबरोबरच सांगितले की, पुढच्या काही वर्षांमध्ये आग, पूर आणि वादळे यासारख्या आपत्ती सातत्याने येत राहतील.
दरम्यान, या नॉस्त्रेदेमसने काही सकारात्मक भविष्यवाण्याही केल्या आहेत. त्यानुसार २०३१ मध्ये कर्करोगावर इलाज मिळेल, तसेच २०९९ मध्ये पृथ्वीवर अद्भूत शांतता प्रस्तापित होईल, असा दावा केला आहे.