सॅन फ्रान्सिस्को- काल (दि.30) रात्री उशिरा पुन्हा एकदा जगभरात व्हॉट्सअॅप क्रॅश झालं होतं. भारतामध्ये रात्र असल्यामुळे त्याचा युजर्सला जास्त फटका बसला नाही, पण युके, युरोप आणि साऊथ अमेरिका आदी ठिकाणी युजर्सला व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याचा जास्त फटका बसला. तसंच भारतातील काही युजर्सनेही व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याच्या तक्रारी केल्या. भारतीय वेळेनुसार अकरा वाजता बंद झालेलं व्हॉट्सअॅप एक वाजता सुरू झालं. व्हॉट्सअॅप सुरू नसल्याच्या तक्रारी जवळपास 36 हजार युजर्सनी केल्या.
गुरूवारी सध्याकाळी अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळासाठी युके, युरोप व साऊथ अमेरिकेतमध्ये व्हॉट्सअॅप क्रॅश झालं होतं. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारात तेथिल युजर्सला व्हॉट्सअॅपवर मेसेज येणं बंद झालं. सुरूवातीला नेमकं काय झालं हे लोकांच्या लक्षात आलं नाही पण बराच वेळ मेसेजच येत नसल्याने व्हॉट्सअॅप क्रॅश झाल्याचं युजर्सच्या लक्षात आलं. साडेसहा वाजता बंद झालेलं व्हॉट्सअॅप सात वाजून अठरा मिनिटांनंतर सुरू झालं. पण या पाऊण तासाच्या वेळेत फेसबुक, ट्विटर या सोशल मीडिया साइट्सवर मात्र युजर्सने नाराजी व्यक्त केली.
व्हॉट्सअॅप बंद झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला. व्हॉट्सअॅप जगभरातील एक अब्जपेक्षा जास्त लोक वापरतात. तसंच व्हॉट्सअॅप क्रॅश होण्याची वेळ क्वचितच येते. पण व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्या युके, युरोप व साऊथ अमेरिकेतील लोकांची गुरूवारी संध्याकाळी चांगलीच गोची झाली. व्हॉट्सअॅप क्रॅश झालं आहे का ? हे तपासण्यासाठी अनेकांनी ट्विटरचा सहारा घेतला. ट्विटरवर जाऊन व्हॉट्सअॅप बंद झाल्याची खात्री युजर्सला झाली.
व्हॉट्सअॅप युजर्सला व्हॉट्सअॅप वापरता आलं नसल्याची आम्हाला खंत आहे. लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत असून लवकरात लवकर समस्या सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करतो आहोत, असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हंटलं.