शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

Taliban in Afghanistan : जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींना मारून विजेच्या खांबावर लटकवले होते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 1:47 PM

Taliban : याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं.

तालिबानच्या (Taliban) सैन्यांनी आता अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुलवर (Kabul) ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनीसहीत (Ashraf Ghani) इतर राजकीय नेते देश सोडून पळाले आहेत. अशात आता अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातवरण आहे. भारत, कॅनडा, अमेरिकेसहीत अनेक यूरोपिय देशही अफगाणिस्तानमधील लोकांना विमानद्वारे बाहेर काढत आहेत. अशात याआधी १९९६ मध्ये जेव्हा तालिबानने काबुलवर ताबा मिळवला होता तेव्हा अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह (Najibullah) यांना मारून विजेच्या खांबाला लटकवण्यात आलं होतं.

तत्कालीन राष्ट्रपती नजीबुल्लाह पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टीचे होते. हा पक्ष कम्युनिस्ट विचारधारेचा होता. जेव्हा पक्ष सत्तेत आला तेव्हा अफगाणिस्तानमध्ये अनेक प्रकारचे सामाजिक बदल आले होते. यात महिलांना त्यांचे अधिकार देण्यात आले होते. सोबतच धर्मनिरपेक्षतेबाबतही पाउल उचलण्यात आले होते.

पण हे सगळं करूनही या पक्षाच्या सरकारमध्ये नागरिकांसोबत चांगला व्यवहार झाला नाही. लोक वैतागले होते. अफगाणिस्तानमधील लोकांमध्ये  सरकार विरोधात नाराजी वाढली होती. अशात सरकार विरोधात लढत असलेल्या विद्रोह्यांना स्थानिक लोकांचं समर्थन मिळू लागलं होतं. १९८७ मध्ये सोव्हिएत संघाच्या मदतीने नजीबुल्लाह अफगाणिस्तानचे राष्ट्रपती बनले होते. (हे पण वाचा : Afghanistan Taliban Crisis: अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?)

राष्ट्रपती बनल्यावर नजीबुल्लाह यांनी अफगाणिस्तानचं संविधान पुन्हा लिहून घेतलं होतं. सोबतच देशाचं नाव बदलून रिपब्लिक ऑफ अफगाणिस्तान ठेवलं होतं. डिसेंबर १९९१ मध्ये सोव्हिएत संघ संपला होता. यानंतर नजीबुल्लाह यांना मिळणारी सगळी मदत बंद झाली होती. नंतर नजीबुल्लाह आपला जीव वाचवण्यासाठी एका कंपाउंडमध्ये १९९६ पर्यंत लपून राहिले होते.

यादरम्यान अफगाणिस्तानमध्ये  तालिबान वाढला होता. तेव्हा त्यांना पाकिस्तान आणि अमेरिकेकडून मदत मिळत होती. तालिबानने जेव्हा काबुलवर ताबा मिळवला तेव्हा नजीबुल्लाह यांना आपल्या सोबत येण्यास सांगितलं. पण त्यांनी सोबत येण्यास नकार दिला होता. यानंतर तालिबानने त्यांचा जीव घेतला आणि काबुलच्या आरियाना चौकात त्यांचा मृतदेह एका विजेच्या खांबाला लटकवला होता.

त्यांची जीव घेण्याआधी त्यांना एका ट्रकच्या मागे बांधून फरफटत नेण्यात आलं होतं. तालिबान्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली होती. ज्या खांबावर त्यांना लटकवण्यात आलं होतं त्याच खांबावर त्यांचा भाऊ शाहपूर अहमदजाईचा मृतदेह लटकवण्यात आला होता. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानInternationalआंतरराष्ट्रीय