शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

"जेव्हा दहशतवाद्यांनी माझ्याकडे पाहिले..."; राहुल गांधींनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2023 10:03 AM

जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले.

लंडन - सुरक्षा रक्षकांनी मला काश्मीरमध्ये पदयात्रा न काढण्याचा सल्ला दिला होता तरी मी भारत जोडो यात्रेत पदयात्रा काढली. त्यावेळी माझा सामना दहशतवाद्यांशी झाला होता असा दावा राहुल गांधींनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर असून केंब्रिज इथं ते संबोधित होते. 

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी भारत जोडो यात्रा करत होतो. तेव्हा काश्मीरमध्ये तुम्हाला धोका आहे असं म्हटलं गेले. तरीही आम्ही यात्रा सुरू केली. तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे आला त्याला माझ्याशी बोलायचं होते. सुरक्षारक्षकांनी तुम्ही असं करू नका. लोकांना जवळ बोलावू नका म्हटलं. तरीही मी त्या व्यक्तीला जवळ बोलावले. तो माझ्याजवळ आला. या व्यक्तीने विचारलं, खरेच तुम्ही आमची समस्या सोडवणार आहात का? मी म्हटलं, हो..आम्ही पुढे जात होतो तेव्हा या व्यक्तीने हात दाखवत तुम्ही ते पाहा असं सांगितले. 

राहुल गांधींनी विचारले. कुठे? त्या व्यक्तीने सांगितले तिकडे...ते दहशतवादी आहेत असं त्या व्यक्तीने म्हटलं. दहशतवाद्यांनी मला मारायला हवं होतं. त्या परिस्थितीत ते माझ्याकडे बघत होते आणि मी त्यांच्याकडे पाहत होतो. मी अडचणीत आहे असं मला वाटले. आम्ही एकमेकांना पाहत राहतो. काहीच घडत नाही मग आम्ही पुढे निघून गेलो असं राहुल गांधींनी म्हटलं. 

असं का घडलं?राहुल गांधींनी पुढे सांगितले असं का घडलं? त्यांच्याकडे काहीच न करण्यासाठी पॉवर नव्हती असं नाही. तर मी त्यांना ऐकण्यासाठी गेलो होतो. मी कुठलीही हिंसा करायला गेलो नव्हतो. अनेकजण हे पाहत होते म्हणून झाले. मीडिया आणि न्यायसंस्था यावर कब्जा केला आहे. दलित, अल्पसंख्याकांवर आदिवासींवर हल्ले होत आहेत. कुणी टीका केली तर त्याला धमकावलं जाते असा आरोप राहुल गांधींना केला. त्याचसोबत जेव्हा मी काश्मीरला गेलो होतो तेव्हा सुरक्षा रक्षक मला भेटले. आम्हाला तुमच्याशी बोलाचंय असं त्यांनी सांगितले. मी काश्मीरमध्ये यात्रा करू शकत नाही असं त्यांनी सांगितले. तुमच्यावर ग्रेनेड हल्ला होऊ शकतो. परंतु मला माझ्या पक्षातील लोकांशी बोलू द्या. मी भारत जोडो यात्रा पूर्ण करणार असा निर्धार राहुल गांधींनी सुरक्षा रक्षकांसमोर बोलून दाखवला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस