बैरुत : इसिस वा इस्लामिक स्टेटस्ने किशोरवयीन मुलांकडून २५ सिरियाई सैनिकांचे शिरकाण केले असून, त्याची चित्रफीत शनिवारी प्रसिद्ध केली आहे. हिरवा व तपकिरी गणवेश घातलेल्या सैनिकांना एका नाट्यगृहाच्या मंचावर गोळ्या घालण्यात आल्या असून, समोर इसिसचा काळा व पांढरा ध्वज फडकताना दिसत आहे. गोळ्या घालणारी सर्व किशोरवयीन मुले असून त्यांनी तपकिरी पट्टे डोक्याला बांधलेले आहेत. सिरियातील प्राचीन शहर असणारे पालमिरा ताब्यात घेतल्यानंतर इसिसने २०० नागरिकांच्या हत्या केल्या होत्या. नाट्यगृहातील हत्याकांडाची माहिती याआधी ब्रिटनमधील सिरियाच्या मानवी हक्क संघटनेने दिली होती. हत्याकांडासाठी रोमन नाट्यगृहाचा वापर करणे म्हणजे क्रौर्याची परमावधी आहे असे सिरियाचे पुरातत्व संचालक मामून अब्देलकरीम यांनी म्हटले आहे. अमेरिकन आघाडीच्या हवाई हल्ल्यात २२ ठार वॉशिंग्टन- इस्लामिक स्टेटस्ची सिरियातील राजधानी असणाऱ्या राका शहरावर अमेरिका आघाडीने शनिवारी १६ हवाई हल्ले केले असून, या हल्ल्यात इसिसचे २२ जिहादी मारल्याचा दावा करण्यात आला आहे. सिरियात केलेले हे हवाई हल्ले इतके परिणामकारक होते की, इसिसच्या जिहादींना राका शहराबाहेर पळणेही शक्य झाले नाही, असे प्रवक्ता लेफ्ट. कर्नल थॉमस गिलेरन यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इसिसकडून २५ सैनिकांचे शिरकाण
By admin | Published: July 05, 2015 10:43 PM