वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या यशस्वी भारत दौऱ्याचा उल्लेख करत व्हाईट हाऊसने वेस्ट विंगमध्ये या आठवड्याला ‘नमस्ते ओबामा’ म्हणून संबोधले आहे. व्हाईट हाऊसच्या घडामोडींशी संबंधित माहिती ‘वेस्ट विंग’द्वारे अधिकृत ब्लॉगवर टाकली जाते.व्हाईट हाऊसच्या ब्लॉगवर शुक्रवारी आठवडाभरातील प्रमुख घडामोडींचा एका चित्रफितीद्वारे वेध घेण्यात आला आहे. यात ‘आॅफिस आॅफ डिजिटल स्ट्रॅटेजी’ या व्हिडिओचे निर्माते अॅडम गार्बेर यांनी लिहिले की, हा २३ जानेवारी ते २९ जानेवारीचा आठवडा वा ‘नमस्ते ओबामा’ आहे. पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ पाच मिनिटे २९ सेकंदाचा आहे.व्हिडिओमध्ये गार्बेर यांनी सांगितले की, या आठवड्यात ओबामा आपल्या कार्यकाळात दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर जाणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ठरले आणि इतिहासही घडला. ते आणि फर्स्ट लेडी दिवंगत शाह यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सौदी अरबलाही गेले. मायदेशी परतल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकी महापौरांशी एका बैठकीत संवाद साधला. तसेच मावळते संरक्षणमंत्री चक हेगेल यांना सन्मानित केले. चित्रफितीत ओबामा भारतीय जनतेला ‘नमस्ते’ करताना दिसतात. ‘एक्झिक्युटिव्ह आॅफिस बिल्डिंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट विंगमध्ये राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय आहे. (वृत्तसंस्था)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याच्या संधीचा अमेरिकेने पुरेपूर फायदा उचलण्याची गरज आहे. आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य संघटना अर्थात एपेकमध्ये भारताच्या सदस्यत्वास पाठिंबा देऊन व्यापार वृद्धी करण्याची संधी मिळवू शकते.परराष्ट्र व्यवहार परिषदेत भारत, पाकिस्तान व दक्षिण आशियाई प्रकरणांच्या वरिष्ठ फेलो एलिसा एअरेस यांनी यासंदर्भातील भूमिका विशद केली आहे. त्या म्हणाल्या, वॉशिंग्टनला मोदी यांच्या रूपाने अखेरीस असा पंतप्रधान मिळाला आहे, जो अमेरिकेसोबतच भारताच्या आर्थिक धोरणात्मक सुधारणा करण्यास तयार आहे.