वॉशिंग्टन, दि. 28 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. व्हाईट हाऊसमधून माहिती सार्वजनिक होण्यामागे ओबामांचा हात आहे असं ते म्हणाले.
फॉक्स न्यूजला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ओबामा प्रशासन तुम्हाला कमजोर करण्यासाठी तुमच्या विरोधातील बातम्यांना हवा देत आहेत का असं प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, सर्व घटनांच्या मागे ओबामा आहेत, हे राजकारण आहे. व्हाईट हाऊसमधील बातम्या लीक होण्यामागे ओबामांच्या टीमचं कनेक्शन आहे असं ट्रम्प म्हणाले. ओबामा किंवा त्यांचे अन्य लोक यामागे असण्याचा मला विश्वास आहे असं ट्रम्प म्हणाले.
काही दिवसांपूर्वी मेक्सिको आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रप्रमुखांसोबत ट्रम्प यांची झालेली चर्चा प्रसार माध्यमांमध्ये झाली होती.