इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध आता अत्यंत धोकादायक टप्प्यावर पोहोचलं आहे. हमास आणि इस्रायलमधील युद्ध १२व्या दिवशीही सुरू आहे. इस्रायलकडून गाझामधील रुग्णालयावर एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासने केला आहे. हमासने म्हटलं आहे की, १७ ऑक्टोबरला रात्री १० वाजताच्या सुमारास इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयावर हल्ला केली. या एअरस्ट्राईकमध्ये ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलने गाझा पट्टीतील रुग्णालयाला हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या या हल्ल्यात जवळपास ५०० लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा हमासकडून करण्यात आला आहे. गाझाच्या खान युनूस अल-अहली या रुग्णालयावर इस्रायलने एअरस्ट्राईक केल्याचा दावा हमासकडून केला जात आहे. गाझातील रुग्णालये अनेक नागरिकांसाठी निवारा आहे, त्यामुळे रुग्णालयात मोठ्या संख्येने नागरिक आहेत.
सदर हल्ल्यावरुन हमास आणि इस्रायल दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. याचदरम्यान इस्रायलने हमासविरुद्ध एक महत्वाचा पुरावा सादर केला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) हमास दहशतवाद्याचा एक ऑडिओ जारी केला आहे. यामध्ये दहशतवादी रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या रॉकेटबद्दल बोलताना दिसून येतंय. आयडीएफचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल यांनी सांगितले की, गाझामधील अल-अहली हॉस्पिटलवरील हल्ल्याला पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद जबाबदार आहे. त्यांनी दहशतवादाशी संबंधित ऑडिओ आणि घटनास्थळाचा फोटो शेअर केला आहे. पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादने हा हल्ला केल्याने हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. इस्लामिक जिहादने रॉकेट योग्य प्रकारे सोडले नसल्यामुळे हा स्फोट झाल्याचे इस्त्रायलने म्हटलं आहे.
हमासची क्रूरता व्हायरल हमासने इस्रायली नागरिकांची अतिशय क्रूरपणे हत्या केली. त्याची भीषणता दाखविणारा व्हिडीओ इस्रायलने जारी केला. त्यात हमासने एका बालकाला जिवंत जाळले, एकाचा शिरच्छेद करत होते, असे व्हिडीओत दाखवले आहे.
मदतीसाठी १३ हजार स्वयंसेवकपॅलेस्टिनीमधील निर्वासितांच्या मदतीसाठी युनायडेट नेशन्स रिलिफ अँड वर्क्स एजन्सी (यूएनआरडब्ल्यूए) या संस्थेचे सुमारे १३ हजार स्वयंसेवक सध्या गाझा परिसरात सक्रिय आहेत. त्यात डॉक्टर, शिक्षक, नर्स आदींचा समावेश आहे.
हमासच्या कमांडरचा खात्माइस्रायलने मंगळवारी हमासच्या आणखी एका कमांडरचा खात्मा केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण विभागाने दिली. अयमान नोफाल असे त्याचे नाव असून तो सेंट्रल ब्रिगेडचा कमांडर तसेच लष्करी गुप्तचर विभागाचा प्रमुख होता.