शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

पुतीन यांच्या ‘सिक्रेट गर्लफ्रेण्ड’चे रहस्य! 'ती' सध्या काय करते? कुठे असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2022 5:20 AM

एलिनाची तुलना अनेक जण हिटलरच्या दीर्घकाळाची मैत्रीण आणि अल्पकाळाची पत्नी इव्हा ब्राऊनीशी करीत आहेत.

रशिया-युक्रेन युद्धाचं काय होणार आणि भडकलेल्या महागाईची बिळं कशी बुजवणार याची चिंता जगभरच्या आम जनतेला  असली तरी काही लोकांना मात्र भलतीच काळजी लागली आहे. त्यातही युक्रेनी आणि काही युरोपिअन देशातले लोक आघाडीवर आहेत. त्यांना त्रास होतोय तो रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या कथित गर्लफ्रेण्डचा. एलिना काबाएवा. ती पुतीन यांची ‘गर्लफ्रेण्ड’ असल्याचे ओपन सिक्रेट आहे, अशी जगभर चर्चा आहे. त्या दोघांनी काही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. तर ही एलिना, वय ३८, ती सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपल्या मुलांना घेऊन एका आलिशान घरात राहते, अशी बातमी ‘मिरर’ वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. त्यानंतर जर्मन, फ्रेंच आणि इंग्रजीत एक ऑनलाइन याचिका तयार करण्यात आली. त्यावर सुमारे ५५ हजार स्वीस नागरिकांच्या  सह्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, एलिनाला स्वित्झर्लंडमधून हाकलून द्या. पुतीन तिकडे युक्रेनच्या जिवावर उठलेले असताना एलिनाला कशाला आश्रय द्यायचा? तिला रशियात परत पाठवा!अर्थात दुसरी एक चर्चा अशीही आहे की, एलिना स्वित्झर्लंडमध्ये नाहीच; ती सैबेरियाच्या डोंगररांगांत कुडे बंकरमध्ये भूमिगत आहे.ही सगळी उलटसुलट चर्चा सुरू असताना एलिनाची तुलना अनेक जण हिटलरच्या दीर्घकाळाची मैत्रीण आणि अल्पकाळाची पत्नी इव्हा ब्राऊनीशी करीत आहेत. - तर प्रश्न असा आहे की, एलिना काबाएवा नेमकी आहे कोण? सत्तरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पुतीन यांच्याशी तिचं नातं काय? एलिना रिदमिक जिमनॅस्टर असून, ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेती खेळाडू आहे. एक नव्हे तर दोन ऑलिम्पिक पदकं, १४ विश्वविजेती पदकं आणि २१ वेळा तिनं युरोपिअन चॅम्पिअनशिप जिंकलेली आहे. ती उत्कृष्ट क्रीडा मॅनेजर आहे. सहा वर्षे ती रशियाच्या संसदेची सदस्यही होती. रशियाची ‘सर्वांत लवचीक खेळाडू’ म्हणून तिचा लौकिक आहे. मात्र या साऱ्याहून कायम चर्चेत राहिलं ते तिचं आणि पुतीन यांचं रहस्यमय नातं. २००१ मध्ये ते दोघे पहिल्यांदा भेटल्याची चर्चा आहे. मात्र त्या काळीच एलिना डेव्हिड मुसोलिनी नावाच्या राजकीय नेत्याच्या प्रेमात होती. पुढे २००५ मध्ये ते वेगळे झाले. २००८ मध्ये मॉस्कोव्हस्की नावाच्या वृत्तपत्राने एलिना आणि पुतीन यांचा साखरपुडा झाल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. त्या वृत्ताची अधिकृत पुष्टी तर कुणी केली नाहीच; पण ते वृत्तपत्रच कायमचे बंद झाले.त्यानंतर आजवर अनेकदा एलिनाचा हाय प्रोफाइल वावर, पुतीन आणि तिचे नाते याची चर्चा, त्याविषयीचे गॉसिप खुलेआम झाले. त्या दोघांना मुलेही असल्याची चर्चा झाली. मात्र एलिना कधीही जाहीरपणे आपल्या नात्याविषयी बोलली नाही. २०१३ मध्ये फक्त एकदा एलिनाने जाहीरपणे सांगितले होते की आपल्याला मूलबाळ नाही. मात्र मार्च २०१५ मध्ये स्वित्झर्लंडच्या एका बड्या  हॉस्पिटलमध्ये एलिनाने एका मुलीला जन्म दिल्याचे वृत्त पसरले होते. ती मुलगी पुतीन यांचीच असल्याची चर्चा झाली.  २०१९ मध्ये मॉस्कोमध्ये तिने जुळ्यांना जन्म दिल्याचे आणि दोन्ही मुलगेच असल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले.  या संदर्भातही अधिकृतपणे ती काहीच बोलली नाही.२००२ पर्यंत आपण सश्रद्ध मुस्लीम असल्याचे ती सांगत असे. मात्र २००३ मध्ये तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. एलिनाचे वडील मुस्लीम तर आई रशियन आहे.  तिचा जन्म ताश्कंदमध्ये झाला. तिचे वडील फुटबॉल खेळाडू होते. वयाच्या तिसऱ्या वर्षी एलिनाचे जिमनॅस्टिक ट्रेनिंग सुरू झाले. १५ व्या वर्षी एलिनाने युरोपिअन चॅम्पिअनशिप जिंकली. १९९६ ते २००८ दरम्यान खेळाडू म्हणून तिचे करिअर उत्तम झाले. २००४ मध्ये तिने काही काळ निवृत्तीही जाहीर केली होती; पण तिच्या प्रशिक्षकाच्या प्रोत्साहन आणि मेहनतीच्या जोरावर तिने कमबॅक केले.मात्र तिच्या खेळापेक्षाही जास्त चर्चेत राहिले ते तिचे आणि पुतीन यांचे नाते. जे त्या दोघांनीही अधिकृतपणे कधीच स्वीकारले नाही. २०१४ नंतर राजकारणातूनही निवृत्ती स्वीकारत एलिना रशियाच्या नॅशनल मीडिया ग्रुपची प्रमुख झाली. ती सरकारी वृत्तवाहिनी आहे. त्या पदासाठी तिला घसघशीत पगार मिळतो, अशी माहिती ब्रिटिश टॅबलॉइड्सनी प्रसिद्धही केली.या साऱ्यात एलिनाचा सार्वजनिक जीवनातला वावर हळूहळू कमी होत गेला. डिसेंबर २०२१ मध्ये मॉस्कोत झालेल्या रिदमिक जिमनॅस्टिक स्पर्धेत नृत्य करताना ती दिसली होती. त्यानंतर मात्र एलिना कुणालाही दिसलेली नाही. मात्र गॉसिपच्या दुनियेत या नात्याविषयी सतत बातम्या पेरल्या जातात, उडतात.. आणि एलिनाचा उल्लेख ‘पुतीन यांची सिक्रेट गर्लफ्रेण्ड’ असा होतच राहतो..एलिना नक्की आहे कुठे?युद्ध सुरू असताना एलिना रशियात आहे, सैबेरियात आहे की स्वित्झर्लंडमध्ये आहे हे खात्रीने कुणीही सांगत नाही. पुतीन यांची सत्ता, त्यांच्याभोवतीचे गुप्ततेचे वलय, त्यांच्या जिवाला धोका असल्याच्या आणि त्यांनी जवळचा स्टाफही बदलून टाकल्याची चर्चा या साऱ्यात पुतीन आणि एलिना यांच्यातले नाते जाहीरपणे कुणाला कधी कळेल, अशी शक्यता नाही.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन