कोरोना व्हायरसने सध्या संपूर्ण जगात कहर केला आहे. कोरोनाचा अत्यंत घातक समजल्या जाणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटने 135 देशांमध्ये आपले हात-पाय पसरले आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. जागतिक महामारी विज्ञन अपडेटमध्ये WHOने म्हटले आहे, की 132 देशांत बीटा तर 81 देशांमध्ये गॅमा व्हेरिएंटचे समोर आले आहेत. यात सांगण्यात आले आहे, अल्फा व्हेरिएंट 182 देशांत अथवा प्रदेशांमध्ये समोर आढळून आला आहे. तर सर्वप्रथम भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंट 135 देशांमध्ये आढळून आला आहे. (WHO says CoronaVirus delta variant spread in 135 countries more than 4 million cases reported in a week)
गेल्या आठवड्यात 26 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान जगभरात 40 लाखहून अधिक कोरोना बाधित समोर आले आहेत. ही वाढ पूर्व भूमध्य आणि पश्चिम प्रशांत भागांत रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाल्याने दिसून येत आहे. येथे गेल्या आठवड्याच्या तुलनेत अनुक्रमे 37 आणि 33 टक्के वाढ झाली आहे. तर आग्नेय आशियाई प्रदेशांत 9 टक्के रुग्ण वाढ झाली आहे.
मृतांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत आठ टक्क्याने कमी -या आठवड्यात जगभरात 64 हजार जणांचा कोरोनाने बळी घेतला. ही संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत आठ टक्क्यांनी कमी आहे. तसेच गेल्या आठवड्याच्या तुलनेत पश्चिम पॅसिफिक आणि पूर्व भूमध्य भागांत, मृत्यूच्या संख्येत अनुक्रमे 48 आणि 31 टक्के घट झाली आहे. गेल्या आठवड्यात, अमेरिकेत सर्वाधिक नवे रुग्ण नोंदवले गेले. येथे 5,43,420 नवे रुग्ण समोर आले, ही संख्या 9 टक्के अधिक होती. भारतात 2,83,923 नवे रुग्ण समोर आले, ही संख्या सात टक्क्यांनी अधिक होती. इंडोनेशियात 2,73,891 नवेन रुग्ण समोर आले, ही संख्या 5 टक्क्यांनी अधिक होती. ब्राझीलमध्ये 2,47,830 नवे रुग्ण समोर आले, ही संख्या 24 टक्क्यांनी अधिक होती. तर इराणमध्ये 2, 06,722 नवे रुग्ण समोर आले, येथील संख्येतही 27 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.
अग्नेय आशियात नव्या रुग्ण संख्येत 9 टक्क्यांनी वाढ -आग्नेय आशिया भागातील नव्या रुग्ण संख्येत गेल्या आठवड्यांच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे (सुमारे 8,41,000 रुग्ण). तसेच, साप्ताहिक मृतांचा आकडा गेल्या आठवड्याप्रमाणेच राहिला आहे (22,000 मृत्यू). या भागात सर्वाधिक नवे रुग्ण भारतातूनच समोर आले आहेत. येथे तब्बल 2,83,923 नवे रुग्ण समोर आले आहेत. या भागात समोर आलेले 80 टक्के रुग्ण हे भारत, इंडोनेशिया आणि थायलंडमधून समोर आले आहेत.