जिनेव्हा: मागील काही दिवसांपासून जगभर कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. काही तत्ज्ञांच्या मते तिसरा डोस गरजेचा आहे, तर काहींच्या मते तिसरा डोस गरजेचा नाही. दरम्यान, आता खुद्ध जागतिक आरोग्य संघटनेन याबाबत मोठं वक्तव्यं केलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) युरोप शाखा प्रमुखानं कोरोना लसीचा तिसरा डोस वाढत्या कोरोना संसर्गाविरोधात मदत करू शकतो, या अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ संसर्गजन्य रोग तज्ञांच्या मतशी सहमत असल्याचं सांगितलं आहे. संक्रमणाचा वाढता संसर्ग अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगत WHO चे युरोप प्रमुख डॉ. हंस क्लुगे म्हणाले, 'युरोपमधील 53 देशांपैकी 33 देशांमध्ये फक्त एका आढवड्यात 10 टक्के किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, त्यांनी अमेरिकन सरकारचे उच्च संसर्गजन्य रोग तत्ज्ञ डॉ.अँथनी फौसी यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलंय. फौसी यांच्या मते, कोरोना लसीचा तिसरा डोस वाढत्या कोरोना संसर्गात मदत करू शकतो.
लसीचा तिसरा डोस कुणी घ्यावा?
क्लुगे म्हणतात, कोरोना लसीचा तिसरा डोस गंभीर किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, अशा लोकांनी घ्यावा. तसेच, ज्या देशाकडे लसीचा मोठा साठा आहे, त्यांनी इतर गरीब देशांना लस पुरवावी, असंही ते म्हणाले.