Tarek Fateh News:पाकिस्तानी वंशाचे कॅनेडियन लेखक तारेक फतेह(Tarek Fateh) यांचे आज वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या प्रियजनांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांची मुलगी नताशा फतेह हिनेच वडिलांच्या निधनाची बातमी दिली. “पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनडाचा प्रेमी, सत्य बोलणारा, न्यायासाठी लढणारा, दलित आणि अत्याचारितांचा आवाज,'' असे तिने आपल्या वडिलांचे वर्ण केले.
तारेक फतेह असे लेखक, स्तंभलेखक आणि राजकीय विश्लेषक होते, ज्यांची स्वतःची ओळख करुन देण्याची अनोखी पद्धत होती. ते म्हणायचे – “मी पाकिस्तानात जन्मलेला भारतीय आहे. इस्लाममध्ये जन्मलेला पंजाबी, मुस्लिम विवेकाचा कॅनडातील स्थलांतरित, मार्क्सवादी तरुण आणि सलमान रश्दीच्या अनेक मिडनाइट चिल्ड्रनपैकी एक आहे."
कोण होते तारिक फतेह?तारेक फतेह यांचा जन्म 20 नोव्हेंबर 1949 रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. 1960 आणि 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात डाव्या विद्यार्थी चळवळीत त्यांचा सहभाग होता. पाकिस्तानातील सरकारच्या धोरणांविरुद्ध आणि धर्मांधतेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. या दशकांमध्ये त्यांना दोनदा लष्करी नियमांचा हवाला देऊन तुरुंगवासही भोगावा लागला. जनरल झिया-उल-हक यांनी 1977 मध्ये त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला होता. त्यांना देशात पत्रकार म्हणून काम करण्यापासून रोखण्यात आले.
पाकिस्तानच्या सद्यस्थितीसाठी त्यांनी इस्लामिक कट्टरतावादाला जबाबदार मानले. 1987 मध्ये ते कॅनडाला गेले. त्यांनी कॅनडाला आपले कामाचे ठिकाण बनवले. कॅनडामध्ये ते राजकीय कार्यकर्ते, पत्रकार आणि टेलिव्हिजन होस्ट म्हणून ओळखले जात होते. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. ते नेहमी सर्व सामाजिक-राजकीय प्रश्नांवर आपले मत मांडायचे.
भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान आहेते नेहमी स्वत:ला पाकिस्तानात जन्मलेला भारतीय म्हणत असे. भारतीय वंशाचा असल्याचा त्यांना खूप अभिमान होता. ते इस्लामिक कट्टरतावादाचे कट्टर टीकाकार होते. त्यामुळे जगभरातील मुस्लिमांकडून त्यांच्यावर अनेकदा हल्ले झाले. मात्र, विविध माध्यमांतून, ब्लॉगमधून, पुस्तकांतून ते निर्भयपणे आपले विचार मांडत राहिले.
तारेकवर फतवाही काढण्यात आलातारेक फतेह इस्लामिक कट्टरतावादाच्या विरोधात उघडपणे आपले धर्मनिरपेक्ष विचार व्यक्त करण्यासाठी ओळखले जात होते. 2017 मध्ये त्यांनी बुरखा वाद आणि तिहेरी तलाकबाबतही आपले वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांचे विधान गैर इस्लामिक असल्याचे म्हटले होते. त्यांनी भारताला अनेकदा पाठिंबा दिला आणि फाळणीला विरोध केला. बुरखा घालणे आवश्यक नाही आणि तिहेरी तलाक हराम आहे, असे त्यांनी एका टीव्ही कार्यक्रमात सांगितल्यावर अनेकांना राग आला. त्यानंतर बरेली येथील एका मुस्लिम संघटनेने तारेक फतहविरोधात फतवा काढला होता.