आवडत्या तरुणीपुढे लग्नाचा प्रस्ताव कसा ठेवावा याच्या अनेकांच्या अनेक कल्पना असतात. हा प्रस्ताव इतरांपेक्षा आगळावेगळा ठरावा, असा त्यांचा प्रयत्न असतो. एका नियोजित वराने एक गुडघा जमिनीवर टेकवून अशीच विचारणा त्याच्या नियोजित वधुला केली. तिला त्याने भेट म्हणून दिला तो मांसाचा पुष्पगुच्छ (मिट बुके). मुसियावोला त्याची मैत्रीण वँग ओईकी याला चिनी व्हॅलेंटाइन डेच्या आदल्या दिवशी लग्नसमारंभात वँग हिला लग्नाची मागणी घालावी, असे त्याला वाटत होते. या पुष्पगुच्छामध्ये फुलांभोवती असतो तशा कोथिंबिरीच्या पानांची सजावटही होती. चँगचुन येथील रेस्टॉरंटमध्ये सिरायो जे लोक जेवण करीत होते, त्यांच्यादेखत तिला लग्नाचा प्रस्ताव देण्यासाठी एका उघड्यावर बसला. सुदैवाने तिलादेखील हा मासांचा पुष्पहार आवडला असावा. तिने तत्काळ ‘हो’ म्हटले.हा आगळावेगळा पुष्पगुच्छ पूर्णविचार करून रोमँटिक सरप्राइजसाठी वापरला गेला. सियावो म्हणाला की, मी लग्नाच्या प्रस्तावासाठी असा पूर्णपणे वेगळा पुष्पगुच्छ निवडला,कारण रेस्टॉरंटमधील मांसाहारी पदार्थ तिला खूप आवडतात. परंतु सगळेच वर काही एवढे नशीबवान नसतात. चीनमधीलच एकाने लग्नाच्या प्रस्तावासाठी जे ठरवले ते तसे झाले नाही. हुआंग योंग्यू याने त्याच्या मैत्रिणीला देण्यासाठी खरोखर पुष्पगुच्छ बनवला. तिने मात्र तो धुडकावून लावत जाहीरपणे त्याला अपमानीत केले. कारण काय तर तो गरीब आहे आणि घरी स्वच्छतागृह बांधण्याचीही त्याची ऐपत नाही. गर्दीच्या टीम प्लाझामधील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये हुआंग एका गुडघ्यावर बसला व त्याने तिच्यापुढे पुष्पगुच्छ देत लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि त्याला नकार मिळाला.
प्रेमासाठी वाटेल ते!, तिला दिला मासांचा पुष्पहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 2:30 AM