नेपाळमध्ये आज सकाळी विमानअपघात झाला. नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर टेक ऑफ दरम्यान विमान कोसळले. विमान कोसळात ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण १९ जण होते. घटनेची माहिती मिळताच बचावपथकाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले. मित्सुबिशी CRJ-200ER या दुर्दैवी सौर्य एअरलाइन्सच्या फ्लाइट 9N-ME मध्ये हा अपघात झाला.
नेपाळच्या काठमांडूत भीषण अपघात; टेक ऑफ करताना १९ प्रवाशांसह कोसळले विमान
या अपघातात एका मुलासह एकाच कुटुंबातील तीन जणांसह एकूण १८ जणांचा मृत्यू झाला. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सौर्य एअरलाइनच्या विमानाला आग लागल्याने हा अपघात झाला. अपघातावेळी विमानात एकूण १९ जण होते.
वृत्तानुसार, या अपघातात मनु राज शर्मा, एअरलाइन तंत्रज्ञ, त्यांची पत्नी प्रिजा खतिवडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आदि राज शर्मा यांचा मृत्यू झाला. प्रिजा यांनी ऊर्जा, जल संसाधन आणि पाटबंधारे मंत्रालयात सहाय्यक संगणक ऑपरेटर म्हणून काम केले.
विमानात एकुण १९ जण होते
या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी, पोखरा-जाणाऱ्या विमानात दोन क्रू मेंबर्स आणि एअरलाइनचे तांत्रिक कर्मचारी असे एकूण १९ जण होते. सकाळी अकराच्या सुमारास हे विमान कोसळले.
या अपघातावर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचे वक्तव्यही समोर आले आहे. या दुर्घटनेत प्राणहानी झाल्यामुळे दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान म्हणाले की नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. या दुःखाच्या काळात सर्वांनी संयम बाळगावा, असे आवाहन त्यांनी केले.