गिथॉर्न : नेदरलँडमधील गिथॉर्न या निसर्गरम्य पर्यटनस्थळाचं वैशिष्ट्य असे की, येथे रस्तेच नाहीत. गावात कुठेही भटकंती करायची असेल तर पाण्यातून बोटीतूनच प्रवास करावा लागतो. या बोटी इलेक्ट्रानिक मोटारवर चालतात. या गावात ना दुचाकी दिसेल ना चारचाकी वाहन. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक भागात लाकडी पूल तयार करण्यात आले आहेत. असे सांगतात की, या गावाची स्थापना १२३० मध्ये झाली. ११७० मध्ये या गावात भयंकर पूर आला होता. तेव्हापासून येथे पाण्याचे प्रवाहच तयार झाले आहेत. ते आजतागायत तसेच आहेत. या आपत्तीतून सावरत या गावाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जगाचा नकाशावर हे गाव पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. १९५८ मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगनंतर येथे पर्यटकांची संख्या वाढली आहे.
इथे सारा प्रवास पाण्यातूनच
By admin | Published: April 20, 2017 12:29 AM