डिनरवेळी पुतिन यांनी जे केलं ते पाहून घाबरली होती मॉडल, म्हणाली - 'तो माणूस सनकी आहे'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 11:10 AM2022-03-09T11:10:27+5:302022-03-09T11:11:13+5:30
Miss BumBum Suzy Cortez : ती म्हणाली की, पुतिन (Vladimir Putin) यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या रंगील्या स्वभावाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. अनेक महिलांसोबत त्यांचं नाव जोडलं जातं. आता एका ब्राझीलियन मॉडल आणि मिस बमबम सूजी कॉर्टेज (Brazilian Model & Miss BumBum Suzy Cortez) ने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. सूजीने २०१८ मध्ये पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांना सनकी असं म्हणाली. ती म्हणाली की, पुतिन यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलची मॉडल सूजी कॉर्टेज (Suzy Cortez) आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना 'सनकी'' आणि 'हिंसक मनोरूग्ण' मानते. सूजी वर्ल्ड कप इव्हेंट २०१८ मध्ये रशियाला गेली होती. तेव्हा तिची भेट पुतिन यांच्यासोबत झाली होती. यावेळी तिने पुतिन यांच्यासोबत डिनर केलं, त्यावेळी पुतिन यांनी असं काही केलं की, तिला अजिबात सहज वाटलं नाही.
सेक्रेटरीच्या माध्यमातून संवाद
सूजी म्हणाली की, 'डिनरवेळी पुतिन यांनी माझा हात दाबला आणि काही वेळ एकटक माझ्याकडे बघत राहिले. ज्यामुळे जरा घाबरले होते'. ती म्हणाली, 'ते असे बसत होते जसे ते सिंहासनावर बसले आहेत. जेव्हाही त्यांना मला काही सांगायचं असायचं तेव्हा ते आधी त्यांच्या सेक्रेटरीला सांगायची आणि नंतर सेक्रेटरी मला येऊन सांगायची की, ते काय म्हणाले. मिस बमबमने सांगितलं की, पुतिन यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिला केव्हाही रशियात येण्याचं निमंत्रण दिलं.
पुतिन यांनी सरकारी गाडी दिली
मिस बमबमने सांगितलं की, जेव्हा ती रशियात पोहोचल तेव्हा मॉस्को फिरण्यासाठी ती टॅक्सीचा वापर करत होती. पण पुतिन यांच्या भेटीनंतर एक सरकारी गाडी तिला सगळीकडे घेऊन जात होती. ती म्हणाली, 'हे सगळं मला फारच अजब वाटत होतं. कारण मला हे कळत नव्हतं की, हे सगळं माझ्या सुरक्षेसाठी आहे की माझ्यावर नजर ठेवण्यासाठी. मी एक आठवडा तिथे थांबले आणि मग ब्राझीलला परत आले. जेव्हा मी वर्ल्ड कपसाठी पुन्हा रशियात गेले तेव्हा पुतिन यांना न भेटण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कारण मला त्यांच्यासोबत सहज वाटत नव्हतं'.
'पुतिन यांनी सिद्ध केलं की ते मनोरूग्ण आहेत'
सूजी म्हणाली की, 'मी त्यांना म्हणाले होते की, जर शक्य झालं तर मी परत येईन. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. पण आज मी हे दाव्याने सांगू शककते की, मॉस्कोमध्ये मी धोक्यात होते'. सध्याच्या युद्धाबाबत ती म्हणाली की, पुतिन यांनी युक्रेनसोबत युद्धाची घोषणा करून हे सिद्ध केलं की, ते खरंच एक हिंसक मनोरूग्ण आहेत.