शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

डिनरवेळी पुतिन यांनी जे केलं ते पाहून घाबरली होती मॉडल, म्हणाली - 'तो माणूस सनकी आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2022 11:10 AM

Miss BumBum Suzy Cortez : ती म्हणाली की, पुतिन (Vladimir Putin) यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या रंगील्या स्वभावाचे किस्से नेहमीच चर्चेत असतात. अनेक महिलांसोबत त्यांचं नाव जोडलं जातं. आता एका ब्राझीलियन मॉडल आणि मिस बमबम सूजी कॉर्टेज (Brazilian Model & Miss BumBum Suzy Cortez) ने तिच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. सूजीने २०१८ मध्ये पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीचा उल्लेख करत त्यांना सनकी असं म्हणाली. ती म्हणाली की, पुतिन यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं.

'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, ब्राझीलची मॉडल सूजी कॉर्टेज (Suzy Cortez) आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांना 'सनकी'' आणि 'हिंसक मनोरूग्ण' मानते. सूजी वर्ल्ड कप इव्हेंट २०१८ मध्ये रशियाला गेली होती. तेव्हा तिची भेट पुतिन यांच्यासोबत झाली होती. यावेळी तिने पुतिन यांच्यासोबत डिनर केलं, त्यावेळी पुतिन यांनी असं काही केलं की, तिला अजिबात सहज वाटलं नाही.

सेक्रेटरीच्या माध्यमातून संवाद

सूजी म्हणाली की, 'डिनरवेळी पुतिन यांनी माझा हात दाबला आणि काही वेळ एकटक माझ्याकडे बघत राहिले. ज्यामुळे जरा घाबरले होते'. ती म्हणाली, 'ते असे बसत होते जसे ते सिंहासनावर बसले आहेत. जेव्हाही त्यांना मला  काही सांगायचं असायचं तेव्हा ते आधी त्यांच्या सेक्रेटरीला सांगायची आणि नंतर सेक्रेटरी मला येऊन सांगायची की, ते काय म्हणाले. मिस बमबमने सांगितलं की, पुतिन यांनी तिचं खूप कौतुक केलं आणि तिला केव्हाही रशियात येण्याचं निमंत्रण दिलं.

पुतिन यांनी सरकारी गाडी दिली

मिस बमबमने सांगितलं की, जेव्हा ती रशियात पोहोचल तेव्हा मॉस्को फिरण्यासाठी ती टॅक्सीचा वापर करत होती. पण पुतिन यांच्या भेटीनंतर एक सरकारी गाडी तिला सगळीकडे घेऊन जात होती. ती म्हणाली, 'हे सगळं मला फारच अजब वाटत होतं. कारण मला हे कळत नव्हतं की, हे सगळं माझ्या सुरक्षेसाठी आहे की माझ्यावर नजर ठेवण्यासाठी. मी एक आठवडा तिथे थांबले आणि मग ब्राझीलला परत आले. जेव्हा मी वर्ल्ड कपसाठी पुन्हा रशियात गेले तेव्हा पुतिन यांना न भेटण्याचा पूर्ण प्रयत्न केला. कारण मला त्यांच्यासोबत सहज वाटत नव्हतं'.

'पुतिन यांनी सिद्ध केलं की ते मनोरूग्ण आहेत'

सूजी म्हणाली की, 'मी त्यांना म्हणाले होते की, जर शक्य झालं तर मी परत येईन. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. पण आज मी हे दाव्याने सांगू शककते की, मॉस्कोमध्ये मी धोक्यात होते'. सध्याच्या युद्धाबाबत ती म्हणाली की, पुतिन यांनी युक्रेनसोबत युद्धाची घोषणा करून हे सिद्ध केलं की, ते खरंच एक हिंसक मनोरूग्ण आहेत. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाBrazilब्राझील