सिंगापूर : पर्यटननगरी सिंगापूरमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. २०२२ मध्ये या देशात ४७६ जणांनी आत्महत्या केल्या. हा गेल्या २० वर्षांतील सर्वाधिक आकडा असल्याचे ‘समरिटन्स ऑफ सिंगापूर’ने (एसओएस) म्हटले आहे. एसओएस ही आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करणारी स्वयंसेवी संघटना आहे.
सिंगापूरमध्ये २०२१ मध्ये ३७८ लोकांनी आत्महत्या केली होती. २०२१च्या तुलनेत २०२२ मध्ये आत्महत्येचे प्रमाण २५.९ टक्क्यांनी वाढले आहे. प्रेमसंबंध, कौटुंबिक, आर्थिक व रोजगाराशी संबंधित समस्यांमुळे लोकांनी इहलोकीची यात्रा संपविल्याचे एसओएसने सांगितले. (वृत्तसंस्था)
आत्महत्येची प्रमुख कारणेमानसिक आरोग्य : उदासीनता, बायपोलर डिसाॅर्डर, स्किझोफ्रेनिया, ऑटिझम, व्यक्तिमत्त्व विकार, कुटुंबातील आत्महत्येचा इतिहास.सामाजिक आरोग्य : नोकरी गमावणे, नातेसंबंध, घटस्फोट, इतरांकडून त्रास दिला जाणे, शोक.शारीरिक आरोग्य : तीव्र शारीरिक वेदना, कर्करोग आणि मेंदूला दुखापत.
सलग चौथ्या वर्षी... सलग चौथ्या वर्षी १० ते १९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे आत्महत्या हे प्रमुख कारण आहे. म्हणजेच या वयोगटातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हे आत्महत्येमुळे झाले.