शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

२१ वर्षीय युवकाला का घाबरली बलाढ्य अमेरिका?; म्हणते, राष्ट्रीय सुरक्षेला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 8:21 AM

जॅकला मागील महिन्यात फेडरल कोर्टासमोर हजर केले होते. ज्याठिकाणी प्रॉसिक्यूटर्सने त्याला जेलमध्ये राहण्यास सांगितले.

अमेरिकेच्या सुरक्षा मंत्रालय पेंटागनमधून लीक झालेल्या टॉप सीक्रेट फाईल्स प्रकरण आता आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. गुप्त दस्तावेज लीक केल्याच्या आरोपाखाली २१ वर्षीय जॅक टेक्सेरा(Jack Teixeria) याला एफबीआयने मागील महिन्यात अटक केली होती. या मुलाची सुटका करणे देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकते असा इशारा अमेरिकेच्या कायदे विभागाने दिला आहे.

जॅकला मागील महिन्यात फेडरल कोर्टासमोर हजर केले होते. ज्याठिकाणी प्रॉसिक्यूटर्सने त्याला जेलमध्ये राहण्यास सांगितले. कायदे विभागाने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले त्यात या २१ वर्षीय जॅकला त्याची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय जेलमधून सुटका करू नये यासाठी कारणे दिली होती. पेंटागनच्या या लीक झालेल्या दस्तावेजांमुळे अमेरिकेचे अनेक सहकारी देश नाराज आहेत. ही ती कागदपत्रे आहेत ज्यात यूक्रेन युद्धाबाबत अनेक महत्त्वपूर्ण माहिती आहे. ज्यामुळे आता ज्यो बायडन यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, जॅकने गेमिंग ग्रुपमध्ये ही गुप्त कागदपत्रे शेअर केली होती.

जॅक टेक्सेरा कोण आहे?जॅक मॅसॅच्युसेट्समध्ये एअर नॅशनल गार्ड्समन म्हणून तैनात होता. तो २०१९ मध्ये एअर नॅशनल गार्डमध्ये रुजू झाला आणि तिथे आयटी स्पेशालिस्ट म्हणून काम करत होता. अमेरिकेतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डिस्कॉर्डच्या चॅटरूममध्ये जॅकने गेमर्सचे अनेक गुप्त दस्तावेज शेअर केले होते. त्याच्या ग्रुपचे नाव होते 'ठग शेकर सेंट्रल'. 

लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये काय आहे?युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात केवळ युक्रेनचे सैन्य युक्रेनच्या बाजूने लढत नाहीत असं लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये उघड झाले आहे. युक्रेनमध्ये सध्या १४ अमेरिकन आणि ५० ब्रिटीश सैन्य आहेत, जे थेट रशियाशी मुकाबला करत असल्याचे कागदपत्रांमध्ये उघड झाले आहे. दुसर्‍या दस्तऐवजात असे म्हटले आहे की, नाटो सदस्य देश अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि लॅटव्हियाचे १०० विशेष अधिकारी आधीच युक्रेनमध्ये उपस्थित होते. २०२१ मध्ये, ब्रिटनच्या विशेष दलांनी युक्रेनच्या सैन्याला प्रशिक्षण दिले. परंतु ब्रिटीश सरकारने युक्रेनमध्ये आपल्या विशेष सैन्याची उपस्थिती कधीच मान्य केली नाही.

या कागदपत्रांमध्ये पाश्चात्य देशांचे विशेष सैन्य युक्रेनमध्ये असल्याचे सांगण्यात आले आहे. यापैकी ब्रिटीश स्पेशल फोर्सेसची टीम सर्वात मोठी असून ब्रिटनची ५०, लॅटव्हियाची १७, फ्रान्सची १५, अमेरिकेची १४ आणि नेदरलँडची एक टीम युक्रेनमध्ये आहे. याहून अधिक धक्कादायक माहिती या दस्तावेजांमध्ये आहे. त्यामुळे हे बाहेर आल्यावर अमेरिकेसह विविध देशांच्या सुरक्षेलाही धोका आहे असं सांगण्यात आले आहे.  

टॅग्स :AmericaअमेरिकाRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया