(Image Credit: www.ladbible.com)
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांची सिंगापूरमध्ये अखेर भेट झाली. या भेटीच्या कित्येक दिवसआधीपासूनच या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मीडिया रिपोर्टनुसार, किम यांनी ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी होकार तर दिला. पण काही अटीही ठेवल्या होत्या. त्यातील एक अट म्हणजे किम हे स्वत:चं टॉयलेट घेऊन येणार.
दक्षिण कोरियाची न्यूज एजन्सी The Chosunilbo ने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा किम एअर चायनाच्या बोईंग 747 विमानाने सिंगापूरला पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत एक IL-76 ट्रान्सपोर्ट प्लेनही होतं. त्यात त्यांचं जेवण, बुलेट प्रूफ लिमोजिन कार आणि एक पोर्टेबल टॉयलेटही होतं.
उत्तर कोरियातील गार्ड कमांडमध्ये काम केलेले आणि 2005 मध्ये दक्षिण कोरियाला पळून गेलेले ली यन कियोल यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितले की, 'सार्वजनिक शौचालयाऐवजी किम हे त्यांच्या प्रायव्हेट टॉयलेटचा वापर करतात. हे टॉयलेट नेहमी त्यांच्यासोबत असतं'.
याचं कारण विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, 'किम जोंग उन यांना त्यांच्या मलमूत्रामधून त्यांच्या आरोग्यासंबंधी माहिती कुणाला मिळण्याची भीती असते. म्हणून ते नेहमी त्यांचं प्रायव्हेट टॉयलेट सोबत घेऊन जातात. कारण असे न केल्यास त्यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो'. इतकेच नाहीतर किम उत्तर कोरियात कुठेही जातात तेव्हाही हे टॉयलेट सोबत घेऊन जातात.
त्यासोबतच दक्षिण कोरियाई न्यूज एजन्सी डेली एनकेनुसार, किमच्या ताफ्यात त्यांचं टॉयलेट घेऊन येणारी एक गाडी असते. त्यांनी या गाड्याही खासकरुन डोंगरात आणि बर्फाच्या परिसरातही चालू शकतील अशा तयार केल्या आहेत.