काल-परवा पाकिस्तानचे नियोजनमंत्री अहसान इकबाल यांनी त्यांच्या देशातील जनतेला चहाचे प्रमाण कमी करण्याचे आवाहन केले. त्यांचे म्हणणे होते की, लोकांनी दिवसातून एक-दोन कप चहा कमीच प्यावा. मात्र, सोशल मीडियावरून या आवाहनाची खिल्ली उडविण्यात आली. आर्थिक अरिष्टात फसलेल्या पाकिस्तानला चहा नकोसा का झालाय, पाहू या...
सर्वात मोठा चहा आयातदार-पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा चहा आयातदार देश आहे.- २२ कोटी लोकसंख्येच्या पाकिस्तानला चहाची तलफ भागविण्यासाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून रहावे लागते.-पाकिस्तानात केवळ दहा टन चहाचेच उत्पादन होते. मात्र, दरवर्षी त्यांना लागतो दोन लाख टन चहा.
चहा कमी का करायचा?- पाकिस्तान सरकारची परकीय गंगाजळी झपाट्याने आटू लागली आहे.- केवळ १० अब्ज डॉलर एवढीच गंगाजळी पाकच्या सरकारी तिजोरीत आहे.- त्यातून जेमतेम दोन महिने तग धरता येईल. म्हणूनच लक्झरी वस्तूंच्या आयातीवर पाकने बंदी घातली आहे.- चहावरील आयातखर्च कमी व्हावा यासाठी पाकिस्तानींनी चहाचे प्रमाण कमी करावे, असे सरकारला वाटते.
पाकिस्तानींचे चहावेडदर सेकंदाला ३००० कप चहा पाकमध्ये प्यायला जातो.दरमहा ७७०कोटी कप चहा पाकिस्तानी पितात.२६ कोटी रुपये वाचतील, नागरिकांचे हे चहाचे वेड कमी झाल्यास - पाक सरकारचा दावाआयातीसाठी कर्ज काढावे लागेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्था अधिकच गाळात जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे.