निवडणुकीच्या तोंडावरच अटक का झाली? केजरीवाल प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने निकाल ठेवला राखून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 06:18 AM2024-04-04T06:18:42+5:302024-04-04T06:35:01+5:30
Arvind Kejriwal: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत.
नवी दिल्ली - दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत.
केजरीवाल यांच्याविरोधात ईडीपाशी कोणताही पुरावा नाही. केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर ईडीला अटक करण्याची गरज का भासली? ईडीने सरकारी साक्षीदारावर दबाव आणून त्यांच्याकडून जबाब नोंदवून घेतला. त्यापैकी दोन साक्षीदारांचे केंद्रातील सत्ताधारी भाजपशी संबंध आहेत, असे केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांनी म्हटले.
साडेचार किलो वजन झाले कमी
मधुमेहाचा आजार असलेले केजरीवाल यांचे आरोग्य संकटात असून त्यांच्या रक्तातील साखर तीनवेळा ४६ पर्यंत घसरली. त्यांचे वजन १२ दिवसात साडेचार किलोंनी घटले. यांच्या प्रकृतीस काही झाल्यास देश माफ करणार नाही, असा इशारा आतिशी यांनी दिला.