कोणाला सुगंधाची तर कोणाला परफ्युमची अॅलर्जी असते; परंतु अॅलर्जीचे हे प्रकरण फारच वेगळे आहे. येथे पत्नीला तिच्या पतीचीच अॅलर्जी झाली आहे. ही महिला अमेरिकेत राहते व तिला जोआना वाटकिन्स नावाची अॅलर्जी झाली आहे. या आजारामुळेच तिला तिच्या पतीपासून अॅलर्जी झाली. या आजारामुळे ही महिला गेल्या वर्षभरापासून आपल्याच खोलीत राहत आहे व तिचा पती दुसऱ्या खोलीत. एवढेच नाही, तर तिला आता प्रत्येक गोष्टीची अॅलर्जी झाली आहे. तिची काळजी घेण्यासाठी पतीने संपूर्ण खोलीला प्लास्टिकने झाकून टाकले आहे. त्याचा प्रयत्न असा आहे की, खोलीत धुळीचे कण, उजेड जाऊ नये. या महिलेच्या आजाराचा शोध घेतला जात आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. महिला किमान ३० डॉक्टरांकडे जाऊन आली आहे; परंतु कोणालाही अॅलर्जीचे मूळ सापडलेले नाही. तिच्या आजाराचाही पत्ता लागणे अवघड बनले होते; परंतु आता डॉक्टरांनी तिचा आजार ‘मास्ट सेल अॅक्टिव्हेशन सिंड्रोम’ असल्याचे सांगितले आहे.
पत्नीला झाली पतीपासून अॅलर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 1:56 AM