एका व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं. डोनेशनसाठी त्याचे अवयव काढण्याचं काम सुरू होणार होतं. इतक्यात व्यक्तीच्या पायाची हालचाल झाली. त्याचे हार्टबीट पुन्हा वाढले. यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की, तो कोमात आहे आणि त्याचा मृत्यू झाला नाही. आताही रूग्ण हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याची स्थिती गंभीर आहे.
ही घटना अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिनामधील आहे. तीन मुलांचा वडील रयान मार्लो याला गेल्या महिन्यात इमरजन्सी डिपार्टमेंटमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तो Listeria ने ग्रस्त होता. नंतर रयानच्या मेंदूवर सूज आली आणि तो कोमात गेला. यानंतर 27 ऑगस्टला डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं होतं. नॉर्थ कॅरोलिनाच्या कायद्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीचा मेंदू काम करणं बंद करतो तेव्हा त्याला मृत घोषित केलं जाऊ शकतं.
याप्रकरणी रयान मार्लोची पत्नीन मेघन म्हणाली की, डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की, तुमच्या पतीचं निधन झालं आहे. त्याची न्यूरोलॉजिकल डेथ झाली आहे. त्यांनी चार्टवर मृत्यूची वेळही लिहिली होती. मग मी डॉक्टरांना सांगितलं की, माझा पती ऑर्गन डोनर आहे. त्या लोकांनी ऑर्गन डोनेशनची प्रक्रिया सुरू केली होती.
महिलेने सांगितलं की, त्यानंतर ती घरी गेली. मेघनने दावा केला की, दोन दिवसांनी डॉक्टरांनी फोन करून सांगितलं की, मुळात रयान ट्रॉमेटिक ब्रेन डॅमेजने ग्रस्त होता. यामुळे डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची वेळ 27 ऑगस्ट बदलून 30 ऑगस्ट केली. मेघन म्हणाली की, डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्याकडून एक चूक झाली. रयानचा मृत्यू झाला नव्हता. त्याची न्यूरोलॉजिकल डेथ झाली नव्हती. मी डॉक्टरांना विचारलं की, याचा अर्थ काय आहे?
मेघनने सांगितलं की, मला सांगण्यात आलं की, रयान मुळात ट्रॉमेटिक ब्रेन स्टेम इंज्यूरीने ग्रस्त होता आणि तो ब्रेन डेडच होता. दुसऱ्या दिवशी रयानचा लाइफ सपोर्ट काढून त्याचे अवयव काढले जाणार होते.
पण डॉक्टरांच्या सर्जरीआधी रयानजवळ मेघनचा भाचा गेला. तिथे त्याने मुलांसोबत खेळतानाचा रयानचा व्हिडीओ लावला. मेघनने सांगितलं की, यानंतर रयानने पायांची हालचाल केली. मी रडू लागले, मला स्वत: खोठी आशा द्यायची नव्हती. मला माहीत होतं की, ब्रेन डेडच्या कंडिशनमध्ये असं होऊ शकतं.
ती म्हणाली की, मी रयानला बघायला रूममध्ये गेले. मी त्याला त्याच्यासमोर ते सगळं सांगितलं जे मी त्याला तो जिवंत असताना सांगू शकले नाही. मी त्याला म्हणाले की, तुला लढायचं आहे कारण मी ऑर्गन डोनेशन प्रोसेस रोखायला जात आहे आणि काही टेस्ट करत आहे.
टेस्टमधून समोर आलं की, रयानचा न्यरोलॉजिकल मृत्यू झालाच नव्हता आणि त्याच्या मेंदूत रक्तप्रवाह होत होता. मेघन म्हणाली की, मी रयानच्या हाताला स्पर्श केला आणि रयानच्या हृदयाचे ठोके सुरू झाले. आता डॉक्टरांनी सांगितलं की, तो ब्रेन डेड नाहीये, पण तो कोमात आहे.
मेघनने शेवटी सांगितलं की, माझा पती फार क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. तो अजूनही रिस्पॉन्ड करत नाहीये. त्याने अजून डोळे उघडलेले नाहीत. रयान अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे आणि क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे.