शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

चंद्रावर बांधणार ‘घर’! ‘नासा’ने मोजले 466 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2022 12:57 PM

आयकाॅन कंपनीसाेबत केला करार

वॉशिंग्टन : चंद्र किंवा मंगळावर राहण्यासाठी ‘कॉलनी’ स्थापण्याची चर्चा गेली अनेक वर्षे सुरू असून, त्यात नासाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे. तेथे वस्ती बांधण्यासाठी नासाने आयकॉन या कंपनीशी करार केला असून, त्यापोटी ४६६ कोटी रुपये मोजले आहेत.अमेरिकेची अंतराळ संस्था ‘नासा’ने ऑलिम्पस प्रकल्प सुरू केला आहे. त्याद्वारे चंद्र किंवा मंगळावर वस्ती निर्माण करण्यासाठीच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. यासाठी तेथीलच दगड-माती कशी वापरता येईल, यावरही संशोधन केले जात आहे.

‘तेथे जायचे अन् परत यायचे’ हा आतापर्यंत अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वाचा टप्पा होता. त्यात पूर्णपणे बदल करावा लागेल. ‘तेथे जायचे अन् तेथेच राहायचे’ असा हा टप्पा असेल. त्यासाठी चंद्र किंवा इतर ग्रहांवरील संसाधनांचा वापर करावा लागेल आणि हे करण्यासाठी तशा सक्षम तंत्रज्ञानाचीही गरज आहे. आमच्या संशोधकांनी असे तंत्रज्ञान शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. आता प्रत्यक्षात ते सिद्धही करून दाखवू, असा दावाही आयकॉनचे सहसंस्थापक आणि सीईओ जेसन बॅलार्ड यांनी केला. 

अपोलो यानाद्वारे चंद्रावरून आणल्या गेलेल्या मातीचा व तशा प्रकारच्या मातीच्या नमुन्यांचा वापर करून चंद्रावरील गुरुत्वाकर्षणात हे बांधकाम किती टिकते, याचेही परीक्षण करणार आहे. कंपनीचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर चंद्रावरील गुरुत्वाकर्षणाच्या परिस्थितीत कसे काम करते, याचाही शोध घेणार आहे. यश येत गेले तर त्यानंतर आणखी पुढच्या टप्प्यातील चाचण्या करून पाहिल्या जातील. त्यांनाही यश आले तर अखेर आपण पृथ्वीबाहेरील जगात घर बांधू, असेही बॅलार्ड म्हणाले.

माॅडेलही केले तयारचंद्र आणि मंगळावर लाँचपॅड, घरे, रस्ते उभारण्यासाठीच्या तंत्रावर काम करण्यासाठी आयकॉन कंपनीने २०२० मध्ये प्रोजेक्ट ऑलिम्पस लाँच केले. कंपनीने या संशोधनात यशही मिळवले होते. त्यानंतर कंपनीने मंगळावर कसे घर असू शकेल याचे मॉडेलही तयार केले. 

टॅग्स :AmericaअमेरिकाNASAनासाHomeसुंदर गृहनियोजनMumbaiमुंबई