ला बुर्गेट, पॅरिस : जागतिक जलवायू परिषदेत सहभागी देशांच्या परस्परविरोधी प्रस्तावांच्या मसुद्यातून निश्चित असा करार आकाराला आणण्याचा प्रयत्न या आठवड्यात केला जाईल. भारताने या चर्चेत सकारात्मक भूमिका बजवायची तयारी दर्शविल्यानंतर हा प्रयत्न केला जाईल. ४८ पानांच्या या मसुद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर न समजणारे पर्याय उपलब्ध आहेत. या मसुद्याच्या आधारावरच भारतासह जगातील सगळे देश बंधनकारक अशा कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करतील. (वृत्तसंस्था)
हवामान बदल परिषद कराराला अंतिम रूप देणार?
By admin | Published: December 06, 2015 10:47 PM