आतापर्यंत तुम्ही फक्त महिलांना प्रेग्नेंट होताना ऐकलं असेल पण आता पुरुषही प्रेग्नेंट होऊ शकतात हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना...चीन नेहमी अजब-गजब रिसर्च करत असतं. चीनच्या वैज्ञानिकांनी एका रिसर्चनंतर पुरूषही प्रेग्नेंट होतात असा दावा केला आहे. चीनच्या सनकी वैज्ञानिकांनी नर उंदरामध्ये गर्भधारणेची पिशवी बसवून काही मुलांना जन्म दिला आहे. पुरूष प्रेग्नेंट करण्याचा चमत्कार चीनच्या वैज्ञानिकांनी करून दाखवला आहे असा दावा त्यांनी केला. अनेक वर्षापासून यावर रिसर्च सुरू होतं. त्यानंतर आता हा निकाल समोर आला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी चीनच्या वुहान लॅबमधून बाहेर पडलेल्या एका वैज्ञानिकाने दावा केला होता की, चीन अजबगजब रिसर्च करत आहे. चीनमध्ये असे बरेच प्रयोग केले जात आहेत जे इतर देशांमध्ये बंदी आहे. चीनच्या वैज्ञानिकांकडून नर उंदराच्या बॉडीवर एक्सपेरिमेंट करण्यात आला. यात नर बॉडीमध्ये मादी बॉडीमधून काढण्यात आलेली गर्भधारणेची पिशवी बसवण्यात आली. त्यानंतर प्रेग्नेंट नराचं सिजेरियन करून त्याच्या पोटातून मुलांना जन्माला घालण्यात आलं. चीनच्या या रिसर्चमुळे भविष्यात पुरूषही प्रेग्नेंट होण्याची संभावना आहे. इंफोवार्स रिपोर्टनुसार आता ज्या ट्रान्सजेंडरला मुलांना जन्माला घालायचं आहे त्यांना याची मदत होणार आहे.
जाणून घ्या कसा झाला हा प्रयोग?
हा प्रयोग शांघायच्या नेवल मेडिकल युनिवर्सिटीत करण्यात आला. यात वैज्ञानिकांनी प्रथम मादी उंदराच्या बॉडीमधून गर्भधारणेची पिशवी बाहेर काढली. त्यानंतर ती नर उंदराच्या शरीरात बसवण्यात आली. त्यानंतर यूट्स ट्रान्सप्लांट करून नराला प्रेग्नेंट केले तेव्हा सिजेरियन करून डिलीवरी करण्यात आली. हा प्रयोग ४ टप्प्यात करण्यात आला. त्याला रॅट मॉडेल म्हटलं जात आहे. परंतु सध्या याचा सक्सेस रेट ३.६८ टक्के इतका आहे. नर उंदरामध्ये प्रयोग केल्यानंतर त्याने १० छोट्या उंदरांना जन्म दिला.
आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे चीनचे वैज्ञानिक रॅट मॉडलचा वापर मानवांवर करण्याचा विचार करत आहेत. पहिल्यांदाच प्रयोगामध्ये एका नराला प्रेग्नेंट करण्यात आलं आहे. त्यात मिळालेल्या यशानंतर आता मानवांवर प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास वैज्ञानिकांना वाटत आहे. याआधी NYU स्कूल ऑफ मेडिसीनने ट्रान्सजेंडर्ससाठी असाच एक प्रयोग केला होता. परंतु तो अयशस्वी ठरला होता.