Imran Khan:पाकिस्तानच्या काश्मीर धोरणाबाबत बोलत असताना पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानात सामील व्हायचं की स्वतंत्र राज्याची निर्मिती करायची याचा सर्वस्वी निर्णय काश्मीरच्या जनतेला घेऊ द्यावा, असं पंतप्रधान इम्रान खान म्हणाले. ते इस्लामाबादमध्ये बोलत होते. (Will let people of Kashmir decide if they want to join Pakistan or become an ‘independent state’: PM Khan)
भारतानं काश्मीर हा देशाचा अविभाज्य घटक आहे आणि कायम राहील अशी ठाम भूमिका घेतली आहे. पण पाकिस्तानकडून मात्र काश्मीरवर नेहमीच दावा करण्यात आला आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना इम्रान खान यांनी काश्मीरला स्वतंत्र प्रांत घोषीत करण्याच्या योजनेवर सरकार काम करत असल्याच्या विरोधी पक्षनेत्यांचा दावा त्यांनी फेटाळून लावला.
पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाजचे (PML-N) नेते मरियाम नवाज यांनी १८ जुलै रोजी आजोजित एका रॅलीमध्ये काश्मीरच्या सध्याच्या अस्तित्वात बदल करुन स्वतंत्र प्रांत घोषीत करण्याची तयारी इम्रान खान सरकारनं केली असल्याचा खळबळजनक दावा केला होता. दरम्यान, इम्रान खान यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावताना असा चर्चा नेमक्या कुठून येतात हे काही मला समजत नाही, असं वक्तव्य केलं.
एक दिवस असा नक्की येईल की काश्मीरची जनताच निर्णय घेईल की त्यांना पाकिस्तानचा भाग व्हायचंय की स्वतंत्र प्रांत म्हणून राहायचंय, असंही इम्रान खान म्हणाले.