शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; पुण्यात विसर्जन मिरवणूक रखडली
2
"दादांनी थांबवलं तरी भाजपाविरोधात निवडणूक लढणार"; अजित पवार गटातील नेत्याचा इशारा
3
नवाब मलिक यांच्या जावयाच्या कारचा भीषण अपघात; समीर खान गंभीर जखमी
4
EPFO News : EPFO मध्ये मोठ्या बदलाचे सरकारचे संकेत, फायदा होणार की नुकसान? पाहा संपूर्ण डिटेल्स
5
पेजर हॅक झाले की मोसादने कंपन्यांसोबत डील केली; लेबनॉन बॉम्बस्फोटानंतर प्रश्न उपस्थित
6
सूरजला ओळखता येईना पाणगेंडा, अंकिताला विचारतो दिसतो कसा? टास्कदरम्यानचा व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू
7
आजचे राशीभविष्य, १८ सप्टेंबर २०२४; खूप मोठा आर्थिक लाभ होईल, यश व कीर्ती वाढेल
8
ममता बॅनर्जी यांना कोर्टाने फटकारले! महिला डॉक्टरांना नाईट शिफ्टपासून रोखू नका
9
देशभरातील बुलडोझर कारवाईवर बंदी, आमच्या आदेशाशिवाय बांधकामे पाडू नका: सर्वोच्च न्यायालय
10
राजधानीत 'आतिशी 'बाजी, केजरीवाल यांचा राजीनामा; आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री होणार
11
मोहना सिंगची 'गगनचुंबी' झेप! बनली तेजस फायटर फ्लीटमधील पहिली महिला फायटर पायलट
12
'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड
13
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रावरील शस्त्रक्रिया यशस्वी; दुखापतग्रस्त हाताने खेळलेला 'डायमंड लीग'
14
अमेरिकेच्या प्रतिष्ठित हम्फ्रे फेलोशिप प्रोग्रामसाठी विजयलक्ष्मी बिदरी यांची निवड
15
अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून
16
हातगाडी लावण्यावरून चाकू हल्ल्यात एकाचा खून; कोल्हापूरच्या आराम कॉर्नर येथील घटना
17
जळगाव जामोदमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, तरुण जखमी; पोलिसांचा हस्तक्षेप
18
तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
19
गोळ्या झाडून पोलीस कर्मचाऱ्याने केला पत्नीचा खून; किरकोळ वादातून उचललं टोकाचं पाऊल
20
'पुढच्या वर्षी लवकर या'चा जयघोष, जळगावात जल्लोषात विसर्जन अन् सामाजिक संदेश

शेख हसीना देशात परत जाणार? बांगलादेशात व्हायरल 'कॉल'ची चर्चा; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 7:02 PM

काही दिवसापूर्वी बांगलादेशात सत्तांत्तर झाले, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशही सोडला आहे.

बांगलादेशात काही दिवसापूर्वी सत्तांत्तर झाले, नोकरीतील आरक्षणाविरोधात देशात मोठे आंदोलन सुरू होते. या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यांनी देशही सोडला आहे. दरम्यान, आता शेख हसीना यांच्या एका कॉल व्हायरल झाला आहे. यामुळे आता त्या पुन्हा एकदा देशात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. 

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना सत्तापालटानंतर देश सोडून भारतात आल्या सध्या त्या भारतातच आहेत. त्यांच्या प्रत्यार्पणाबाबत बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि त्यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार वादग्रस्त विधाने करत आहेत. हसीना यांच्यावर फौजदारी कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला

ढाका ट्रिब्यूनमधील एका अहवालात म्हटले आहे की, माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा त्यांच्या अवामी लीग नेत्यासोबतचा १० मिनिटांचा फोन कॉल रेकॉर्डिंग लीक झाला आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये हसीना यांच्याबाबत नव्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र शेख हसीना यांच्या या कथित कॉल रेकॉर्डिंगची अद्याप पडताळणी झालेली नाही. व्हायरल होत असलेल्या या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये अवामी लीगच्या नेत्यांना त्या बाहेर असताना आलेल्या आव्हानांची आणि परदेशातील पक्षाच्या निष्ठावंतांशी असलेल्या संबंधांची माहिती देण्यात आली होती. 

शेख हसीना आणि तनवीर नावाच्या व्यक्तीमध्ये हे संभाषण झाले आहे, ते ढाकामधील कमरंगीरचरचा रहिवासी आहे. या संभाषणात तन्वीरने शेख हसीना यांना अवामी लीगच्या नेत्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली, या क्लिपमधून हे दिसत आहे. 

यात शेख हसीना सांगत आहेत की, माझ्यावरही ११३ खटले आहेत. तनवीर बांगलादेशला परतल्यास कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही शेख हसीना यांनी दिला. तन्वीरने अवामी लीगचे आणखी एक नेते इमदाद यांच्या नेतृत्वाखालील यूएसमधील रॅलींचा संदर्भ दिला. 

संभाषणादरम्यान तन्वीरने पक्षाच्या खराब स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि सुचवले की तो बांगलादेशला स्थानिक नेतृत्वाला संघटित करण्यात मदत करू शकेल. मात्र, शेख हसीना यांनी त्यांना तसे करण्यास मनाई केली आणि देशापासून दूर राहून पाठिंबा गोळा करण्यास सांगितले.

विशेष म्हणजे शेख हसीना यांना गाझियाबादहून दिल्लीला एका खास विमानात आणण्यात आल्याची अफवा फोनमध्ये पसरली होती. मात्र, त्यांनी याबाबत पुरावे दिले आणि गरज पडल्यास त्या बांगलादेशला परत येऊ शकतात, असेही सांगितले. मी देशाच्या खूप जवळ आहे, असंही शेख हसीना या संवादात म्हणाल्या. मी फार दूर नाही; मी इतक्या जवळ आहे की मी पटकन परत येऊ शकते, असंही शेख हसीना यांनी या संवादात म्हटले आहे. 

टॅग्स :Bangladeshबांगलादेश