रशियातील कझान येथील ब्रिक्स परिषदेत ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’ या मुद्द्याला अधिक महत्व देण्यात आले. जगातील तीन मोठ्या आर्थिक शक्ती एका व्यासपीठावर आल्याने पाश्चिमेकडील सर्वच देशांचे लक्ष यांच्याकडे लागले होते. या परिषदेत भारत, रशिया आणि चीनने अमेरिकेला व्यापारासंदर्भात थेट आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेल्या देशांनी आपसातील व्यवहार अथवा व्यापर डॉलरऐवजी स्थानिक चलनात करण्यावर जोर दिला आहे. अर्थात भारत या देशांसोबत डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करू शकणार आहे. सध्या जागतिक व्यापारातील बहुतांश व्यवहार केवळ डॉलरमध्ये होतात.
ब्रिक्स देशांनी बुधवारी व्यापार वाढविणे आणि त्यासाठी स्थानीक चलनाची व्यवस्था करण्यास सहमती दर्शवली आहे. याशिवाय, स्वतंत्रपणे कार्यरत क्रॉस-बॉर्डर सेटलमेंट आणि डिपॉझिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रिक्स पुनर्विमा कंपनीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली आहे. तसेच, सदस्य देशांच्या नेत्यांनी 21व्या शतकात नव विकास बँकेला एक नव्या प्रकारची बहुपक्षीय विकास बँक (एमडीबी) म्हणून विकसित करण्यावरही सहमती दर्शवली असून ब्रिक्सच्या नेतृत्वातील बँकेचे सदस्यत्व वाढविण्याचेही समर्थन केले आहे.
असं आहे ब्रिक्सचं घोषणा पत्र -16व्या ब्रिक्स शिखर सम्मेलनानंतर, जारी करण्यात आलेल्या घोषणापत्रात म्हणण्यात आले आहे की, सदस्य देश कामाकाजात स्थिरता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात संयुक्त कामकाची शक्यता शोधतील. BRICS नेत्यांनी 21 व्या शतकातील मानवी जीवनाच्या सर्व पैलूंच्या वेगाने होणाऱ्या डिजिटलायझेशन प्रक्रियेसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. तसेच, विकासासाठी डेटाची महत्त्वपूर्ण भूमिका आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी BRICS मधील प्रतिबद्धता अधिक घट्ट करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
तीन बडे नेते एका व्यासपीठावर -या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांतील प्रमुकांनी भाग घेतला होता. ब्रिक्सने म्हटले आहे की, आम्ही व्यापारातील अडथळे कमी करणे आणि भेदभावविरहित प्रवेश करण्याच्या तत्त्वावर तयार, वेगवान, कमी किमतीच्या, कार्यक्षम, पारदर्शक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक क्रॉस-बॉर्डर पेमेंट उत्पादनांचे सर्वसमावेशक फायदे जाणतो. ब्रिक्स देश आणि त्यांचे व्यापारी भागीदार यांच्यातील आर्थिक व्यवहारांत स्थानिक चलनांच्या वापराचे आम्ही स्वागत करतो.