प्रत्येक नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी त्या वर्षी होणाऱ्या महत्त्वपूर्ण घटनांविषयी भविष्यवाण्या केल्या जातात. तर काही प्रख्यात भविष्यवेत्त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या आहेत. त्यातील अनेक काळाबरोबर खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा आणि नास्त्रेदेमस यांच्या भविष्यवाण्या प्रख्यात असून, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी केलेल्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता सुरू होणाऱ्या २०२३ य वर्षासाठीही नास्त्रेदेमस आणि बाबा वेंगा यांनी काही भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यातील एक भविष्यवाणी ही तिसऱ्या महायुद्धाबाबत आहे.
फ्रेंच भविष्यवेत्ता नास्त्रेदेमस याचा मृत्यू १५६६ मध्ये झाला होता. मात्र त्याने येणाऱ्या शेकडो वर्षांसाठीच्या भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यामध्ये तिसरं महायुद्ध, जगाचा शेवट अशा काही भविष्यवाण्यांचा समावेश आहे. नास्त्रेदेमसच्या भविष्यवाणीनुसार २०२३ मध्ये एक मोठं युद्ध होणार आहे. हे युद्ध सुमारे ७ महिने चालेल. यामध्ये लोक मोठ्या प्रमाणावर मारले जातील. आता लोक नास्त्रेदेमसच्या या भविष्यवाणीकडे रशिया-युक्रेन आणि चीन आणि तैवान यांच्यात होत असलेल्या संघर्षाशी जोडून पाहत आहेत.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध तिसऱ्या महायुद्धाचे रूप घेण्याची शक्यता जितकी आहे, तितकीच शक्यता ही जर अमेरिका तैवानला वाचवण्यासाठी उभा ठाकला तर हा संघर्ष मोठ्या युद्धात परिवर्तित होऊ शकतो. अशा परिस्थितीत तिसरं महायुद्ध झालं तर त्याचं कारण हे रशिया नाही, तर चीन असेल. बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांनीसुद्धा २०२३ मध्ये तिसरं महायुद्ध होण्याची आणि त्यात जैविक हत्यारांचा वापर होण्याबाबतची भविष्यवाणी केली होती.
सन २०२३ साठी नास्त्रेदेमसने तिसऱ्या महायुद्धाबरोबरच इतर काही भविष्यवाण्याही केल्या आहेत. नास्त्रेदेमसच्या म्हणण्यानुसार मानवाला लाल ग्रहावर म्हणजेच मंगळावर पोहोचण्यासाठीच्या एका मोठ्या मोहिमेला यश मिळू शकेल.
नास्त्रेदेमसच्या अनुयायांच्या मते हिटलरचा उदय, दुसरे महायुद्ध आणि अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला दहशतावादी हल्ला आणि कोरोनाच्या साथीबाबत नास्त्रेदेमस याने आधीपासूनच भविष्यवाणी केली होती. मात्र बाबा वेंगा आणि नास्त्रेदेम यांच्या भविष्यवाण्यांचा वैदिक ज्योतिषाशी संबंध नाही. मात्र त्यांच्या भविष्यवाण्यांची चर्चा होत असते.