वॉशिंग्टन : जेरुसलेमला इस्त्राएलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाविरोधातील ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मोठ्या बहुमताने संमत झाल्याने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अतिशय संतापले आहेत.या ठरावाला पाठिंबा देणाºया देशांच्या आर्थिक मदत आम्ही थांबवू, अशी धमकी त्यांनी आमसभेच्या आधी दिली होती. ती धमकी ते अंमलात आणणार का, याकडे सर्र्वाचे लक्ष लागले आहे. आमसभेत अमेरिकेच्या निर्णयाला विरोध करणारा ठराव मंजूर झाला, तेव्हा अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्रातील राजदूत निक्की हॅली यांनीही अशीच धमकी दिली होती. जी राष्ट्रे आमच्याविरोधात ठराव करू पाहत आहेत, त्यांच्या नावाची यादी आपण डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे देणार आहोत, असे त्या म्हणाल्या होत्या.या ठरावाला संयुक्त राष्ट्रांच्या १९३ पैकी १२८ सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला होता, तर ३५ राष्ट्रांच्या सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. तसेच २१ राष्ट्रांचे सदस्य त्यावेळी गैरहजर राहिले आणि केवळ ९ सदस्यांनी अमेरिकेच्या बाजूने मतदान केले. विरोधी मतदान करणाºयांत भारतासह ब्रिटन, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यांचाही समावेश होता. (वृत्तसंस्था)जगातील अनेक देशांना अमेरिका अर्थसाह्य करीत असते. त्या सर्र्वाची मदत खरोखर बंद केली जाईल का आणि ते शक्य आहे का, याबाबत विविध मते व्यक्त होत आहेत.
यूएनमधील पराभवानंतर अमेरिका मदत बंद करेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 1:23 AM