अनेक वाहने महामार्गावर एकमेकांवर धडकून अपघात झाल्याचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. गुरुवारी सकाळी विस्कॉन्सिनमधील महामार्ग 94 वरील जवळपास 34 मैल भाग बंद करण्यात आला होता, कारण या महामार्गावरील बर्फामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकली होती.
सीएनएनच्या वृत्तानुसार, ही वाहने एक लाइनमध्ये पश्चिम विस्कॉन्सिनमधील जॅक्सन काउंटीमध्ये धडकली होती. या अपघाताचे कारण रस्त्यावरील बर्फ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, रस्त्यावर अनेक वाहने धडकली असली तरी त्यात कोणाचाही मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. अनेक जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
बर्फवृष्टीमुळे महामार्गावर निसरडी स्थितीअधिकृत निवेदनात अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेनोमॉनी आणि ब्लॅक रिव्हर फॉल्स दरम्यान बर्फवृष्टीमुळे महामार्गावर निसरडी स्थिती (स्लिपी कंडीशन) निर्माण झाली होती, ज्यामुळे सेमी ट्रेलर रस्त्यावर घसरला आणि आग लागली. यावेळी सेमी ट्रेलरजवळून जाणाऱ्या दोन गाड्याही या आगीत सापडल्या.
दरम्यान, याबाबत राज्य पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जवळपास 30 हून अधिक वाहने एकमेकांना धडकली आहेत. मात्र, काही रिपोर्टनुसार, सुमारे 100 वाहनांचा अपघात झाल्याचे म्हटले जात आहे.