अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या गव्हर्नरवर एका महिलेने शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. महिलेचं नाव शेली विले आहे. तिने सांगितले की, गव्हर्नर अॅन्ड्रयू ग्युमोने तिला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. घटनेचा उल्लेख करत महिला म्हणाली की, ग्युमोचं हे वागणं फारच लैंगिक, चुकीचं आणि माझ्या परिवारासाठी अपमानजनक होतं'.
न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय विले म्हणाल्या की, गव्हर्नरवर गैरवर्तणुकीचा आरोप लावणारी ती १०वी महिला आहे. याआधीही काही महिलांनी गव्हर्नरवर अशाप्रकारचे आरोप लावले आहेत. विलेचे वकिल Allred ने एका पत्रकार परिषदेत सांगितले की, ही घटनी २०१७ ची आहे. ग्युमोने २०१७ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान विलेचा हात पकडला आणि त्यांच्या सहमतीशिवाय त्यांना जबरदस्ती किस करू लागला.
पीडित विले म्हणाली की, 'गव्हर्नर सर्व्हेक्षण दरम्यान माझ्या घरी आले होते. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मला संपर्क केला. माझा हात त्यांनी धरला आणि मला त्यांच्याकडे खेचलं. त्यानंतर त्यांनी माझ्या गालावर किस केलं. यावेळी माझ्या हातात एक लहान कुत्रा होता. विलेने सांगितले की, यावेळी गव्हर्नरने तिच्यासोबत फारच उत्तेजक संवाद साधला. ज्याची ती कल्पनाही करू शकत नाही. (हे पण वाचा : पत्नी पकडणारच होती, बोरिस जॉन्सनसोबत त्यांच्या घरातच रोमान्स; अमेरिकन बिझनेस वुमनचा दावा)
पीडित म्हणाली की, 'मी हैराण झाले आणि मला कळलं नाही की, आता काय झालं. पण त्याचं असं वागणं मला लाजिरवाणं वाटलं. गर्व्हनरने मला जबरदस्ती किस करणं विचित्र वाटलं. मी इटालियन आहे. आणि माझ्या परिवारात किस फक्त परिवारातील लोकच करू शकतात. अनोळखी लोकांना किस केलं जात नाही. खासकरून पहिल्या भेटीत तर अजिबात नाही करत'.
इतकेच नाही तर पीडित विले पुढे म्हणाली की, या घटनेनंतर गव्हर्नर ग्युमो घरातून निघत होते. तेव्हा त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले 'तू सुंदर आहे'. याने मला आणखीनच विचित्र वाटलं. मला वाटलं की, माझ्याच घरात तो माझ्या जवळ येत आहे.