सोशल मीडिया आणि टेक्नॉलॉजी कशाप्रकारे सामान्य लोकांच्या जगण्याला प्रभावित करत आहे हे सर्वांनाच माहीत असेल. याचंच एक विचित्र आणि धक्कादायक उदाहरण म्हणजे अमेरिेकेतील एका महिलेने तिची सुसाइड नोटही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेड्यूल करत सुसाइड केली. २४ वर्षीय ही तरूणी मृत पावल्याच्या दुसऱ्या दिवशी तिची सुसाइड नोट इन्स्टावर पोस्ट झाली.
न्यूयॉर्कच्या ब्रूकलीनमध्ये राहणाऱ्या योचेवे गोरॅरीच्या या शेवटच्या पोस्टमध्ये तिचा स्वत:चा फोटो होता आणि ती सूर्याकडे बघत होती. या फोटोसोबत तिने एक पोस्टही लिहिली. या पोस्टच्या पहिल्या भागात या तरूणीने लिहिले होते की, ही फार संवेदनशील आणि शॉकिंग पोस्ट आहे. त्यामुळे तुम्ही ही पोस्ट तुमच्या रिस्कवर वाचा. तिने पुढे लिहिले की, जर तुम्ही हे वाचत असाल तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की, मी आतापर्यंत मरण पावलेली असेल किंवा मी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जीवन आणि मृत्यूच्या मधली लढाई लढत असेल. मी ही शेड्यूल केलेली पोस्ट डिलीटही करू शकणार नाही. आणि मला डिलीटही करायची नाही.
याआधी या तरूणीच्या काही पोस्टमधून हे स्पष्ट होतं की या तरूणीला एनोरेक्सिया आणि डिप्रेशनची समस्या होती. ती तिच्या पोस्टच्या माध्यमातून मेंटल हेल्थबाबत जागरूकताही पसरवत होती. मे २०१९ मध्ये तिने लिहिले होते की, ती तिच्या डिप्रेशनसाठी मदत घेत आहे. ती गेल्या काही दिवसांपासून टिकटॉकवर थेरपी सेशन्स घेत फनी व्हिडीओही बनवत होती.
या तरूणीने हेही मान्य केलंय की, एका पब्लिक सुसाइट नोटमुळे तिच्या पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याबाबत तिने तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये लिहिले की, मी माझ्या पालकांसाठी पर्सनल इन्स्टाग्राम नोटही पोस्ट केली आहे. जर त्यांना माझ्या कारणांबाबत पब्लिकमध्ये बोलायचं असेल तर ते असं करू शकतात. मी या पब्लिक नोटच्या मदतीने त्यांच्यासाठी अडचणी उभ्या करत आहे. पण मला असं करायचं नव्हतं. बस जाता जात आपल्या अंदाजात आपली अखेरची निशाणी हे जग सोडून जाताना ठेवून जायची आहे.
या तरूणीने सुसाइड नोटच्या शेवटी लिहिले आहे की, तुम्ही सर्वांनी माझं आयुष्य आनंदाने सजवण्याचा प्रयत्न केला. मला सपोर्ट केला. मला पुढे जाण्याचा प्रेरणा दिली. तुम्ही सर्वांनी मला चांगलं बनण्याचा प्रयत्न केला. पण मी ज्या मार्गावर होते त्यावर तुमच्यापैकी कुणीच माझी मदत करू शकत नव्हते. आशा आहे की, आता तुम्हाला याचा आनंद वाटेल की मी जिथेही असेल वेदनेत नसेल.