शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

बाबो! नवऱ्याला घटस्फोट देत हिनं कुत्र्याशी बांधली लग्नगाठ, म्हणते मी जगातील सर्वात आनंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 1:15 PM

यूनायटेड किंगडममध्ये एका महिलेनं ४७ वर्षाच्या वयात आपल्या पतीला घटस्फोट दिला. यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं.

पती आणि पत्नीचा (Husband Wife Relationship) घटस्फोट होणं ही तशी काही नवीन बाब नाही. मात्र एखाद्याने पतीला सोडून आपल्या पाळीव प्राण्यासोबत लग्न केलं तर हे नक्कीच अजब वाटणारं आहे. यूनायटेड किंगडममध्ये एका महिलेनं ४७ वर्षाच्या वयात आपल्या पतीला घटस्फोट दिला. यानंतर तिनं पाळीव कुत्र्याला आपला जोडीदार म्हणून निवडलं.

अमांडा रोजर्स (Amanda Rodgers) नावाच्या या महिलेचा असा दावा आहे की ती आपल्या कुत्र्यासोबत लग्न केल्यानंतर अतिशय आनंदात आहे. The Sun च्या वृत्तानुसार, 2014 साली तिनं अगदी वाजतगाजत लग्न केलं होतं. यानंतर 200 लोकांसमोर तिनं आपल्या डॉगी शेबाला आपला जोडीदार म्हणून निवडलं. महिला आता या मुक्या जीवासोबत इतकं चांगलं आयुष्य जगत आहे की इतक्या वर्षांच्या आधीच्या लग्नात ती इतकी आनंदी कधीच नव्हती.

क्रोएशियामध्ये राहणारी अमांडा आपल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर एकटीच राहात होती. यानंतर एक दिवस तिनं आपला पाळीव श्वान शेबासोबत प्रथा-परंपरेनुसार लग्नगाठ बांधली. तिनं त्याच्यासोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली आणि किस करत त्याला आपला लाईफ पार्टनर मानलं. आता अमांडा रोजर्सचं म्हणणं आहे, की शेबा तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. शेबा तिला हसवते, आनंदी ठेवते आणि कठीण काळात तिला आधारही देते. शेबा तिला कधीच त्रास देत नाही आणि तिची विशेष काळजीही घेते. एका टीव्ही शोमध्ये बोलताना महिलेनं सांगितलं की शेबा २ महिन्यांची असतानाच मला तिच्यावर प्रेम झालं आणि अखेर आम्ही लग्न केलंच.

अमांडाने सांगितलं की शेबाच्या डोळ्यांमध्ये तिला खरं प्रेम दिसलं. या कुत्र्यासोबत तिचं अतिशय खास नातं आहे. मजेशीर बाब म्हणजे अमांडा सांगते की शेबाला या लग्नाबद्दलही माहिती आहे. कुत्र्याला आपला जोडीदार बनवण्यासाठी अमांडाने गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. याचं उत्तर कुत्र्याने आपली शेपटी हालवून हा असं दिलं होतं. आता अमांडा या श्वानासोबत अगदी आनंदी आयुष्य जगत आहे.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटके